जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदवा : हुसेन कुरेशी
जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदवा : हुसेन कुरेशी
बुलढाणा (प्रतिनिधी) : राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड तसेच पश्चिम बंगाल राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करून लाखो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा भविष्य उज्ज्वल केला आहे. याच प्रमाणे महाराष्ट्र शासनाने ०१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करावी.या एकमेव संविधानीक मागणी साठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने मार्फत दिनांक २१/०९/२०२२ रोजी जुनी पेन्शन संदेश बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या जुनी पेन्शन योजना पुर्ववत सुरु करण्याची मागणीसाठी आयोजित बॉईक रॅली ला महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क लढा सेनेचा जाहीर पाठींबा आहे.म्हणुन जिल्हाभरातील हजारो जुनी पेन्शन हक्क सेनेचे पेन्शन सैनिक, शिक्षक सेनेचे शिक्षक सैनिक यांनी ही रैली अभूतपूर्वरित्या यशस्वी करण्यासाठी व शासनाला आपल्यावरील अन्यायाची जाणीव करून देण्यासाठी उद्या दिनांक २१/०९/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता आपण सर्वांनी जिजामाता प्रेक्षकगार बुलढाणा येथे एकत्रित व्हायचं आहे. ही भव्यदिव्य बाईक रॅली जिजामाता प्रेक्षकगार येथुन जिल्हाधिकार्यालय बुलढाणा पर्यंत राहील. याची नोंद द्यावी. तसेच सर्वांनी सदर बाईक रॅली मध्ये सामील व्हावे. असे आव्हान श्री हुसेन कुरेशी जिल्हा समन्वयक, श्री सचीन डोंगरदिवे जिल्हा कार्यध्यक्ष , श्री विलास खेडेकर जिल्हा सरचिटणीस,श्री निलेश कठाले,श्री संदीप इंगळे,श्री आशिष चिंचोळकर जिल्हा उपाध्यक्ष, श्रीमती मनिषा भराड महिला जिल्हा समन्वयक,श्री बाळु गव्हाने,श्री संतोष कापडे जिल्हा उपाध्यक्ष,श्री राम कांगणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व श्री नवल पहुरकर,श्री निलेश गव्हांदे, श्री प्रशांत जुमडे,श्री तुकाराम चव्हाण,श्री ढगे, तालुका समन्वयक महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क लढा सेना यांनी केली आहे.
दैनीक संवाद युगनायकांचा मनःपुर्वक धन्यवाद
ReplyDelete