सरपंचाने खरंच गावाचा विकास केला का..? निधी, विकासकामांची माहिती ‘येथे’ मिळणार…!!

सध्या वाशिम जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूक जवळ आली, की इच्छूक उमेदवार आश्वासने देत सुटतात. दुसरीकडे आपल्या काळात किती विकासकामे केली, याची आकडेवारी सत्ताधारी मतदारांसमोर सादर करतात. त्यातून नेमकं कोणाचं खरं, हे समजत नसल्याने मतदारांचाही गोंधळ उडतो.

सरपंचांनी कोणता निधी कुठे आणि कशावर खर्च केला, गावातील ज्या कामासाठी निधी खर्च केला, त्याची खरंच गरज होती का, त्यातून सरपंच व सदस्यांनी केलेल्या विकासकामांवर शंका उपस्थित होते. मात्र, आता तुम्हाला ही सारी माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. त्याद्वारे ग्रामपंचायतीने खरंच किती विकास केला, हे जाणून घेता येणार आहे..

सरपंचांनी गावाच्या विकासासाठी खरंच काम केलंय की नाही, याचा माहिती घरबसल्या जाणून घेता येते. त्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे जाणून घेऊ या…

अशी जाणून घ्या माहिती..

– सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून ‘ई-ग्राम स्वराज’ हे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच पुढील वेबसाईटवरूनही माहिती घेऊ शकता – https://egramswaraj.gov.in/financialProgressReport.do

– ‘ई-ग्राम स्वराज’ हे अ‍ॅपवर राज्य, जिल्हा परिषदेमध्ये तुमचा जिल्हा, ब्लॉक पंचायतमध्ये तालुका आणि व्हिलेज पंचायतमध्ये गावाचे नाव निवडा.
– आर्थिक वर्ष निवडल्यानंतर समोर तीन पर्याय दिसतात. पहिला ‘ईआर डिटेल्स’ पर्याय निवडल्यास सरपंच, सचिव व ग्रामपंचायत सदस्यांची सविस्तर माहिती मिळते. सध्या ही माहिती भरण्याचे काम सुरु आहे.

सरपंचाने खरंच गावाचा विकास केला का..? निधी, विकासकामांची माहिती ‘येथे’ मिळणार…!!

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूक जवळ आली, की इच्छूक उमेदवार आश्वासने देत सुटतात. दुसरीकडे आपल्या काळात किती विकासकामे केली, याची आकडेवारी सत्ताधारी मतदारांसमोर सादर करतात. त्यातून नेमकं कोणाचं खरं, हे समजत नसल्याने मतदारांचाही गोंधळ उडतो.

सरपंचांनी कोणता निधी कुठे आणि कशावर खर्च केला, गावातील ज्या कामासाठी निधी खर्च केला, त्याची खरंच गरज होती का, त्यातून सरपंच व सदस्यांनी केलेल्या विकासकामांवर शंका उपस्थित होते. मात्र, आता तुम्हाला ही सारी माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. त्याद्वारे ग्रामपंचायतीने खरंच किती विकास केला, हे जाणून घेता येणार आहे..

सरपंचांनी गावाच्या विकासासाठी खरंच काम केलंय की नाही, याचा माहिती घरबसल्या जाणून घेता येते. त्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे जाणून घेऊ या…

अशी जाणून घ्या माहिती..

– सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून ‘ई-ग्राम स्वराज’ हे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच पुढील वेबसाईटवरूनही माहिती घेऊ शकता – https://egramswaraj.gov.in/financialProgressReport.do

– ‘ई-ग्राम स्वराज’ हे अ‍ॅपवर राज्य, जिल्हा परिषदेमध्ये तुमचा जिल्हा, ब्लॉक पंचायतमध्ये तालुका आणि व्हिलेज पंचायतमध्ये गावाचे नाव निवडा.
– आर्थिक वर्ष निवडल्यानंतर समोर तीन पर्याय दिसतात. पहिला ‘ईआर डिटेल्स’ पर्याय निवडल्यास सरपंच, सचिव व ग्रामपंचायत सदस्यांची सविस्तर माहिती मिळते. सध्या ही माहिती भरण्याचे काम सुरु आहे.

– दुसरा पर्याय ‘अ‍ॅप्रुव्ह अ‍ॅक्टिव्हीटीज्’ असून, त्यात ग्रामपंचायतीला कोणत्या कामांसाठी किती निधी मंजूर झाला, याची माहिती मिळते.
– तिसरा पर्याय ‘फायनान्स प्रोग्रेस’मध्ये गावाच्या आर्थिक प्रगतीची माहिती दिलेली आहे.
– तुम्ही निवडलेल्या आर्थिक वर्षात तुमच्या गावासाठी किती निधी आला, पैकी किती खर्च झाला, याची माहिती ‘एक्सपेंडीचर’ पर्यायासमोर दिसते.

– खाली योजनांची यादी असून, त्यात ग्रामपंचायतीला मिळालेल्या एकूण निधीची विभागणी केलेली असते.
– अनेक ग्रामपंचायती दिलेल्या निधीपैकी 40-50 टक्केही निधी खर्च करीत नसल्याने हा निधी सरकारला परत जातो, त्याचीही माहिती येथे मिळते.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू