राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती व विश्वगुरू स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त*जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा* चे आयोजन
राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती व विश्वगुरू स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त * जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा * चे आयोजन (ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा शैक्षणिक उपक्रम) स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन मार्फत दि.२८ नोव्हेंबर २०२२ ते ५ जानेवारी २०२३ दरम्यान *जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा*आयोजित करण्यात आली आहे.दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती,विश्वगुरू स्वामी विवेकानंद जयंती तसेच स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन च्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्त *जिल्हास्तरीय सामान्यज्ञानस्पर्धा* आयोजित करण्यात आली असल्याचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चे अध्यक्ष राजेश पाटिल ताले यांनी सांगितले.ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेची माहिती व्हावी,शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धापरीक्षेविषयी जागृती व्हावी,विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावी,विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी,विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार काळावेत, महापुरुषांच्या विचारांवर समाजा...