Posts

महिला संरक्षण कायद्यांविषयी २० ऑगस्ट रोजी वेबीनार · जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम

Image
महिला संरक्षण कायद्यांविषयी २० ऑगस्ट रोजी वेबीनार ·          जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम वाशिम ,  दि. १७ :  लॉकडाऊन किंवा नंतरच्या काळात घरगुती हिंसाचारापासून संरक्षणाबाबत महिलांमध्ये समाज माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचा उपक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने हाती घेतला आहे. याअंतर्गत घरगुती हिंसाचार विषयक कायद्याबाबत माहिती देण्यासाठी गुरुवार, २० ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२.१५ ते १ वा. दरम्यान वेबीनारचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी दिली आहे. ‘वेबीनार’ सर्वांसाठी निशुल्क असणार असून यामध्ये वकील ,  संरक्षण अधिकारी ,  समुपदेशक ,  समाजसेवक मार्गदर्शन करणार आहेत. ‘वेबीनार’मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी लक्ष्मण खडसे (भ्रमणध्वनी क्र. ९७६६२१५९७२) यांच्याशी व्हाटसअपद्वारे संपर्क करून माहिती उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले आहे. *****  

जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांसाठी विशेष मोहीम - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

Image
  जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांसाठी विशेष मोहीम -   जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक वाशिम ,  दि. २० (जिमाका) :  जिल्ह्यात कोरोना विषयक चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून विशेष मोहीम राबवून कोरोना बाधितांचा शोध घेतला जाणार आहे. या अंतर्गत सर्व व्यापारी, दुकानदार व व्यावसायिकांची कोरोना विषयक चाचणी करण्यात येणार आहे. तसेच लक्षणे असलेलेल्या नागरिकांची सुद्धा चाचणी करण्यात येणार असून व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी स्वतःची चाचणी करून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधितांचा शोध घेवून त्यांचे अलगीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आरटीपीसीआर टेस्ट सोबतच रॅपिड एँटिजेन टेस्टवरही भर दिला जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्व दुकानदार, व्यापारी, औषध विक्रेते, फळे व भाजीपाला विक्रेते, दुध विक्रेते, सलून चालक यासह इतर सर्व व्यावसायिकांची कोरोना विषयक चाचणी करण्यात येणार आहे. स्वतःच्या ...

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिवस

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिवस  वाशिम, दि. २० (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित सद्‌भावना दिन कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी उपस्थितांना शांतता व अहिंसेची प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक तथा नायब तहसीलदार सुधीर नागपूरकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात ६ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात ६ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू वाशिम, दि. २० (जिमाका) : जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी मोहरम उत्सवास प्रारंभ व २२ ऑगस्ट रोजी श्रीगणेश स्थापना होणार आहे. ३० ऑगस्ट रोजी मुस्लीम बांधवांचा मोहरम (ताजिया), १ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर दरम्यान मोहरम व श्रीगणेश विसर्जन होणार आहे. या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी २३ ऑगस्ट २०२० रोजीचे ००.०१ वा ते ६ सप्टेंबर २०२० रोजीचे २४.०० वाजेपर्यंत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) नुसार जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश यांनी लागू करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, लाठ्या किंवा काठ्या तसेच शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीचे प्रेत अथवा मनुष्याकृती प्रतिमा यांचे बीभत्स प्रदर्शन करणे, वाद्य वाजविणे, किंकाळ्या फोडणे किंवा जाहीरपणे प्...

तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा सोयाबीनवरील प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजना करा · कृषि विभागाचे आवाहन

Image
  तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा सोयाबीनवरील प्रादुर्भाव नियंत्रणासाठी उपाययोजना करा ·         कृषि विभागाचे आवाहन वाशिम ,  दि. १७ :  जिल्ह्यात १० ऑगस्ट पासून सतत ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडत असून सोयाबीन कायिक वाढ मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पीक फुलोरा व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असून सध्याच्या वातावरणात सोयाबीन पिकावर तंबाखूची पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टेरा लिटूरा) अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ह्या अळीवर नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. सध्या सतत पाऊस सुरु असून वातावरण ढगाळ आहे, तसेच कृष्णपक्ष पंधरवडा आहे. तंबाखूची पाने खाणारी (स्पोडोप्टेरा) एक मादी पतंग अमावस्येपूर्वी सोयाबीन पिकांच्या पानाच्या खालच्या बाजूला २०० ते ३०० अंडी घालते, तीन ते चार दिवसांत अंड्यातून बारीक अळ्या बाहेर पडून पानातील हरितद्रव्य खाऊन पानाची चाळण करतात. ही अळी पहिल्या व दुसऱ्या अवस्थेत सहज नजरेस पडत नाही. तिसऱ्या अवस्थेतील अळीचा प्रादुर्भाव सहज ओळखता येतो. अशावेळी पिकांचे मोठ्य...

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान

  जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना विशेष अधिकार प्रदान वाशिम ,  दि. १७ :  जिल्ह्यात १८ ऑगस्ट २०२० रोजी पोळा व १९ ऑगस्ट २०२० रोजी पोळाकर तसेच २२ ऑगस्ट २०२० रोजी गणेश स्थापना व १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर २०२० रोजपर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शहरी व ग्रामीण भागात निघणार आहेत. २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२० या दरम्यान मुस्लीम धर्मियांचा मोहरम उत्सव साजरा होणार आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व फौजदार व त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना १८ ऑगस्ट २०२० ते ३ सप्टेंबर २०२० या काळात मुंबई पोलीस अधिनियमचे कलम ३६ नुसार विशेष अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी कळविले आहे. रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील अथवा जमावातील लोकांना कशा रीतीने चालावे, त्यांनी वर्तवणूक किंवा वागणूक कशी ठेवावी, याविषयी निर्देश देणे ,  मिरवणुकीचा मार्ग व वेळ विहित करणे ,  मिरवणूक अथवा जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्यावेळी जागांच्या आसपास उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यावरून किंवा सार्वजनिक जागा किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी ...

कोरोना_अलर्ट

Image
कोरोना_अलर्ट (दि. १७ ऑगस्ट २०२०, सायं. ६.३० वा.)   ४९ जणांना डिस्चार्ज; आणखी १३ कोरोना बाधित   वाशिम शहरातील सुदर्शननगर येथील ४, सुंदरवाटिका येथील २, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील ६, गोहगाव हाडे येथील २, मंगरूळपीर शहरातील पोस्ट ऑफिस परिसरातील ३, टेकडीपुरा येथील १, बालाजी टॉकीज परिसरातील १, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, कवठळ येथील ८, मंगळसा येथील १, बोरव्हा येथील १, शेलूबाजार येथील १, कारंजा लाड शहरातील वाणीपुरा येथील १, माळीपुरा येथील १, गवळीपुरा येथील १, स्वस्तिकनगर येथील २, सुंदरवाटिका येथील १, सुदर्शन कॉलनी परिसरातील १, प्रियदर्शनी कॉलनी परिसरातील ५, सिंधी कॅम्प येथील १, दादगाव येथील १, आखातवाडा येथील १, कामरगाव येथील ३ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   दरम्यान, वाशिम शहरातील चंडिका वेस परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, विवेकानंद कॉलनी, लाखाळा परिसरातील १, कोल्ही येथील २, मंगरूळपीर शहरातील राधाकृष्ण नगरी परिसरातील १, शिवणी येथील २, धानोरा बु. येथील १, रिसोड शहरातील अयोध्या नगर परिसरातील २, सवड येथील १, बेलखेडा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्...

बेलखेडा येथे एक कोरोना पाॅझिटीव्ह

  बेलखेडा येथे एक कोरोना पाॅझिटीव्ह रिसोड:- दिनांक १६/८/२०२० (भारत कांबळे). बेलखेडा येथील एक महिला कोरोना पाॅझिटीव्ह आढळली असुन.पुर्णगाव चिंतामय होऊन हादरले आहे.शिरपुर पोलिस स्टेशनच्या आदेशानुसार पोलिस पाटील माधव सावळे.तंटामुक्तीअध्यक्ष गजानन देव्हडे.यांनी लाऊडस्पीर द्वारे असली दुदैवी माहिती आज दिनांक १६/८/२०२० रोजी सकाळी पहाटे सात वाजता गावकऱ्यांना दिली आहे.व येथील गावकऱ्यांना आपल्या घराच्या बाहेर कुनीही दिसता कामा नये.गावातील सर्व किराणा दुकाने .स्वस्थ धान्य‌‌‌ दुकान पानटपरी पुढील तिन दिवस बंद ठेवण्यात यावेत.सॅनीटयझर साबनाने हात स्वच्छ धुवावेत.प्रत्येक नागरीकांच्या तोंडावर रूमाल किंवा माॅस्क बांधने गरजेचे आहे.अन्यथा कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कोरोना बाधित महिला वाशिम येथील सेक्युरा रुग्णालयात तिनदिवस झाले भत्ती असल्याची माहिती गजानन देव्हडे यांच्या कडुन मिळाली आहे.आज दिनांक १६/८/२०२० रोजी सकाळी पहाटे सात वाजता .लाऊडस्पिकर द्वारे सुचना दिल्याने गावकऱ्यांनाक्षज्ञर कळाले.सदर बाबतीत गा रथवातील लोकांनी घाबरुन न जाता शासनाने दिलेले निदैश तंतोतंत पालन करावेत.कसलीच दखल होणार न...

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणाला प्राधान्य - पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणाला प्राधान्य - पालकमंत्री शंभूराज देसाई   वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहण सोहळा  वा शिम ,  दि. १५ :  सध्या जगभर कोरोना संसर्गाच्या संकटाने थैमान घातले आहे. आपल्या वाशिम जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. कोरोनाच्या संकटातून जिल्ह्याला बाहेर काढण्यासोबतच आगामी काळात सर्व घटकांच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन गृह (ग्रामीण ) ,  वित्त ,  नियोजन ,  राज्य उत्पादन शुल्क ,  कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते.या वेळी आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, सहाय्...

रेडिओ वत्सगुल्म 90.8 एफ.एम येथे ध्वजारोहण स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे,स्वातंत्र म्हणजे जबाबदारी – अमोल देशमुख

Image
रेडिओ वत्सगुल्म 90.8 एफ.एम येथे ध्वजारोहण  स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे,स्वातंत्र म्हणजे  जबाबदारी – अमोल देशमुख    वाशीम :- रेडिओ वत्सगुल्म 90.8 एफ.एम.वाशीम येथे केंद्र प्रमुख अमोल देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे यामध्ये प्रसार माध्यमांची भूमिका खूप महत्वाची होती आणि आहे असे प्रतिपादन देशमुख यानी केले. स्वातंत्र म्हणजे स्वैराचार नव्हे,स्वातंत्र म्हणजे  जबाबदारी आहे.  रेडिओ च्या माध्यमातून कोरोना या आजारा संबंधी प्रभावी जनाजागृती होत असल्याची माहिती ह्यावेळी त्यांनी दिली.  ह्या प्रसंगी रेडिओ वत्सगुल्म चे इरफान सय्यद, वसिम निजामी, देव इंगोले,मो.समीर,नरेश खंदारे गौरव दवणे ,ज्योती इंगळे,सपणा डोंगरे,मनस्वी उजवे आदी मान्यवर उपस्थित होते.                        

डिजिटल बँकिंग प्रणाली वापरामुळे गावे झाली स्मार्ट

Image
 *डिजिटल बँकिंग प्रणाली वापरामुळे गावे झाली स्मार्ट* *क्रिसील फौंडेशन अंतर्गत मनिवाईज केंद्र चा पुढाकार* रिझर्व बँक, स्टेट बँक आणि नाबार्ड च्या माध्यमातून क्रिसील फौंडेशन च्या सहकार्याने महत्वकांक्षी  असलेल्या वाशिम जिल्हा मध्ये आर्थिक साक्षरता करीता मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्राची स्थापना 2017 मध्ये जिल्हा तील पाच तालुक्या मध्ये करण्यात आली.ग्रामीण भागात दीर्घकालीन आर्थिक साक्षरता आणणे आणि समुदाय पातळीवर सहभागात्मक व आत्मनिर्भर दृष्टीकोनामार्फत आर्थिक शोध वर्तन निर्माण करणे हा मुख्य उद्देश घेऊन कार्य सुरू करण्यात आले आहे.             मा .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया मधील डिजिटल आर्थिक साक्षरता पूर्ण करण्याचे काम वाशिम जिल्हा मध्ये क्रिसील फौंडेशन च्या माध्यमातून करण्यात येत आहे.येणाऱ्या काळात भारताची अर्थव्यवस्था ही खूप वेगाने पुढे जाणार आहे त्यामुळे भविष्यात डिजिटल बँकिंग हे पूर्ण क्षमतेने वाढणार आहे ,आपल्या देशा मध्ये   एक वर्ग असा ही आहे ज्याला डिजिटल बँकिंग चा गंध नाही कारण भारता मध्ये शहरी भाग सोडला तर...

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीदिना निमित्त

Image
  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमास उपस्थित श्री.वंसतराव कराळे,  काँग्रेस तालुका संघटक बबन खाडे,श्री.दत्तराव खाडे,सौं.अंजनाबाई खाडे, आकाश गवळी, राहुल वाघमारे, अमोल सोनुले,सौ.पल्लवी खाडे,अर्णव खाडे आदींनी श्रद्धांजली वाहिली.

ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करावी -सौ.किरणताई गि-हे

Image
 ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करावी -सौ.किरण गि-हे यासाठी जिल्हाधिकारी मार्फ़त राष्ट्रपतीना दिले  निवेदन . वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय श्रध्येय एड.प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश सदस्य सौ.किरणताई गि-हे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी साहेब जिल्हा वाशिम मार्फत सन्माननीय राष्ट्रपतीना निवेदन देण्यात आले.देशामध्ये ओबिसी समाजाला मंडल कमीशन आयोगानुसार 27 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली असून मेडिकलच्या पदवीधर व पदवीत्तर स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये प्रवेश प्रक्रियेती ल आरक्षण नाकारण्यात आले आहे.या प्रवेश प्रक्रियेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात असणाऱ्या वैद्यकीय संस्थाना ओबीसी आरक्षण लागू केले नाही.त्यामुळे हा परिणाम झाला आहे.तरी शासनाच्या या आरक्षण विरोधी आरक्षणाबाबत मंडल कमीशन नुसार 27% आरक्षण पूर्ववत ठेवण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी,महिला आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेश सदस्या सौ.किरणताई गि-हे, यांनी दिला.या वेळी नागसेन सुरवाड़े,प्रा.सुभाष अंभोरे, प्रा.ऊके,राज...

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा दौरा

  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा दौरा वाशिम ,  दि. १४ :  शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ह्या शनिवार, १५ ऑगस्ट २०२० रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी ११.३० वा. वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी १.३० वा. वाशिम येथून मोटारीने चिखली (जि. बुलडाणा)कडे प्रयाण. *****

आजचा वाशिम जिल्ह्यातील कोरोना_अलर्ट

  #कोरोना_अलर्ट (दि. १३ ऑगस्ट २०२०, सायं. ७ वा.)   २३ जणांना डिस्चार्ज;  आणखी ३९ कोरोना बाधित; १ मृत्यू   मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील २, शेलूबाजार येथील १०, कारंजा लाड शहरातील विश्वभारती कॉलनी येथील १, मजीदपुरा येथील १, लोकमान्य नगर येथील १, हातोतीपुरा येथील १, पोलीस स्टेशन जवळील १, भारतीपुरा येथील १, पोहा येथील २, कामरगाव येथील १, वाशिम शहरातील खतीबपुरा येथील १, इलखी येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.     वाशिम शहरातील शिवप्रताप नगर येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ७, शिरसाळा येथील २१, मंगरूळपीर येथील पोस्ट ऑफिस रोड परिसरातील १, शेगी येथील १, कारंजा लाड शहरातील भारतीपुरा येथील १, गायत्री मंदिर परिसरातील ५, किन्ही रोड बायपास परिसरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.   दरम्यान, अमरावती येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील ७० वर्षीय व्यक्तीचा ६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला असून त्याची नोंद आज घेण्यात येत आहे.   सद्यस्थिती   एकूण पॉझिटिव्ह  – १०८८ ऍक्टिव्ह  –  ३७० डिस्चार्ज  –...