महिला संरक्षण कायद्यांविषयी २० ऑगस्ट रोजी वेबीनार · जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम
२० ऑगस्ट रोजी वेबीनार
· जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा उपक्रम
वाशिम, दि. १७ : लॉकडाऊन किंवा नंतरच्या काळात घरगुती हिंसाचारापासून संरक्षणाबाबत महिलांमध्ये समाज माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचा उपक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने हाती घेतला आहे. याअंतर्गत घरगुती हिंसाचार विषयक कायद्याबाबत माहिती देण्यासाठी गुरुवार, २० ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२.१५ ते १ वा. दरम्यान वेबीनारचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी दिली आहे.
‘वेबीनार’ सर्वांसाठी निशुल्क असणार असून यामध्ये वकील, संरक्षण अधिकारी, समुपदेशक, समाजसेवक मार्गदर्शन करणार आहेत. ‘वेबीनार’मध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी लक्ष्मण खडसे (भ्रमणध्वनी क्र. ९७६६२१५९७२) यांच्याशी व्हाटसअपद्वारे संपर्क करून माहिती उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले आहे.
*****
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME