डिजिटल बँकिंग प्रणाली वापरामुळे गावे झाली स्मार्ट

 *डिजिटल बँकिंग प्रणाली वापरामुळे गावे झाली स्मार्ट*


*क्रिसील फौंडेशन अंतर्गत मनिवाईज केंद्र चा पुढाकार*


रिझर्व बँक, स्टेट बँक आणि नाबार्ड च्या माध्यमातून क्रिसील फौंडेशन च्या सहकार्याने महत्वकांक्षी  असलेल्या वाशिम जिल्हा मध्ये आर्थिक साक्षरता करीता मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्राची स्थापना 2017 मध्ये जिल्हा तील पाच तालुक्या मध्ये करण्यात आली.ग्रामीण भागात दीर्घकालीन आर्थिक साक्षरता आणणे आणि समुदाय पातळीवर सहभागात्मक व आत्मनिर्भर दृष्टीकोनामार्फत आर्थिक शोध वर्तन निर्माण करणे हा मुख्य उद्देश घेऊन कार्य सुरू करण्यात आले आहे.

            मा .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया मधील डिजिटल आर्थिक साक्षरता पूर्ण करण्याचे काम वाशिम जिल्हा मध्ये क्रिसील फौंडेशन च्या माध्यमातून करण्यात येत आहे.येणाऱ्या काळात भारताची अर्थव्यवस्था ही खूप वेगाने पुढे जाणार आहे त्यामुळे भविष्यात डिजिटल बँकिंग हे पूर्ण क्षमतेने वाढणार आहे ,आपल्या देशा मध्ये   एक वर्ग असा ही आहे ज्याला डिजिटल बँकिंग चा गंध नाही कारण भारता मध्ये शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागामध्ये या डिजिटल सुविधा  बद्दल माहिती नाही,ग्रामीण भागातील लोकांनी सुद्धा स्मार्ट व्यवहार करावा यासाठी वाशिम जिल्हा मध्ये क्रिसील फौंडेशन च्या माध्यमातून जिल्हा मध्ये पाच ही मनिवाइज केंद्र च्या अंतर्गत ग्राम पातळीवर आर्थिक साक्षरता अंतर्गत बँकिंग सेवा सुविधा विषयी  प्रशिक्षना चे आयोजन वेगवेगळ्या गावा मध्ये करण्यात आले,यामुळे जिल्हा तील अनेक गावे बँकेचा आर्थिक व्यवहार करण्यासाठी डिजिटल बँकिंग चा वापर करीत आहे यामध्ये  इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग अंतर्गत ई वालेट भीम अप्स ,गुगल पे, फोन पे,आधार सक्षम पेमेंट प्रणाली,एटीएम ,याचा वापर करून अर्थीक व्यवहार करीत आहे.

           देशामध्ये डिजिटल इंडिया अंतर्गत भारत सरकारने सुरू केलेली मोहीम आहे याचा उद्देश बँक व शासकीय सेवा ही प्रत्येक नागरिकांना इलेक्ट्रॉनिक रित्या उपलब्ध करून देणे असा आहे ,देशाच्या तांत्रिक क्षेत्रात डिजिटल रित्या उच्च पातळीवर नेने असा हेतू यामागील आहे ,हाच उद्देश पूर्ण करण्यासाठी क्रिसील फौंडेशन ने पुढाकार घेतला आहे ,आणि आर्थिक साक्षरता दीर्घकालीन टिकण्यासाठी गावा गावात मनिवाइज आर्थिक साक्षरता समिती स्थापन केल्या आहेत,गावपातळीवर ही समिती विशेष समिती म्हणून कार्य करत आहे, वित्तीय साक्षरता मध्ये अशा प्रकारची गाव समिती प्रथम च क्रिसील फौंडेशन च्या माध्यमातून अस्तित्वात आली आहे, या समितीच्या अंतर्गत गावा मध्ये आर्थिक साक्षरतेचे कार्य अविरत पणे होत आहे.समिती च्या अंतर्गत गावा मध्ये लोकांना अधिकाधिक बँकिंग प्रणालीची माहिती व्हावी या करिता व या सोबतच दीर्घकालीन आर्थिक साक्षरता निर्माण करून लोकांना स्वावलंबन बनविण्याचे कार्य या समिती च्या अंतर्गत गावपातळीवर होत आहे.या सोबतच गावपातळीवर ग्रामीण वित्तीय सल्लागार ची ही नियुक्ती करण्यात आली यांच्या अंतर्गत मोफत बँक सेवा सुविधा विषयी ची माहिती गावातील लोकां प्रयन्त पोहचविण्याचे कार्य होत आहे.

             सदर कामकाज करीत असताना मागील काही महिन्या पुर्वी जागतिक महामारी चे संकट कोविड19 या रुपात आले,या काळात कोरोंना या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन अंतर्गत लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली,या काळात मनिवाइज केंद्र चे काम न थांबता वर्क फ्रॉम होम नुसार सुरू सर्व टीम चे अंतर्गत सुरू राहले,या वेळी पाच ही केंद्र अंतर्गत मोफत ग्राम साहाय्य हेल्पलाईन क्रमांक ची सुरुवात करण्यात आली या क्रमांक च्या माध्यमातून जिल्हा तील लोकांना कोविड 19 ची जनजागृती सोबत घर बसल्या आपले आर्थिक व्यवहार कसे करता येतील याविषयी ची माहिती देण्यात आली,याच सोबत बॅक चेक करून लोकांना डिजिटल बँकिंग च्या साधनाची माहिती देण्यात येत होती,या काळात शासनाने गरीब कल्याण योजने अंतर्गत जनधन खात्या वर तीन महिन्या प्रयन्त दरमहा आर्थिक मदत दिली, हीच रक्कम काढण्यासाठी किंवा रक्कम जमा झाली की नाही हे पाहण्यासाठी लोकांनी मोबाईल, लॅपटॉप ,कम्प्युटर च्या साधनांनी डिजिटल बँकिंग साधनाचा वापर केला,.मनिवाईज ने दिलेल्या प्रशिक्षण मुळे लॉक डाऊन च्या काळात बँका मधील होणारी गर्दी टाळून बँक खातेदार आपला आर्थिक व्यवहार डिजिटल बँकिंग च्या साधनांनी करीत आहे, मनिवाइज केंद्र च्या माध्यमातून घेतलेल्या प्रशिक्षण मुळे गावतील लोकांचा वेळ ,पैसा,श्रम वाचून डिजिटल बँकिंग व्यवहार करिता प्रोत्साहित झाले आहे,मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया चे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे खेड्यातील लोक आता बँकेचा आर्थिक व्यवहार करण्यासाठी डिजिटल बँकिंग च्या साधनांचा वापर करीत आहेत,या सोबतच आर्थिक चळवळ करिता स्थापित समित्या नी सुद्धा गावपातळीवर उल्लेखनीय काम केले लोकांना अधिकाधिक कोविड 19 व डिजिटल बँकिंग प्रणालीचा वापर करण्या साठी प्रोत्साहित केले.जिल्ह्यातील गावांना डिजिटल इंडिया च्या प्रवाहात आणण्याचे कार्य क्रिसील फौंडेशन च्या अंतर्गत करण्यात येत आहे ,लॉक डाऊन च्या काळात जिल्हा तील गाव आर्थिक व्यवहार करिता डिजिटल बँकिंग च्या साधनांचा वापर करून स्मार्ट ग्राम स्मार्ट व्यवहार या नुसार आदर्श गावे म्हणून ओळख निर्माण करीत आहेत.सदर चे कामकाज जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक निनावकर, नाबार्ड चे सहाययक व्यवस्थापक विजय खंडरे,क्रिसील फाउंडेशन चे राज्य समन्वयक शक्ती भिसे व जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच ही तालुक्यातील मनिवाइज केंद्र कार्य करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू