आजचा वाशिम जिल्ह्यातील कोरोना_अलर्ट
#कोरोना_अलर्ट
(दि. १३ ऑगस्ट २०२०, सायं. ७ वा.)
२३ जणांना डिस्चार्ज; आणखी ३९ कोरोना बाधित; १ मृत्यू
मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील २, शेलूबाजार येथील १०, कारंजा लाड शहरातील विश्वभारती कॉलनी येथील १, मजीदपुरा येथील १, लोकमान्य नगर येथील १, हातोतीपुरा येथील १, पोलीस स्टेशन जवळील १, भारतीपुरा येथील १, पोहा येथील २, कामरगाव येथील १, वाशिम शहरातील खतीबपुरा येथील १, इलखी येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.
वाशिम शहरातील शिवप्रताप नगर येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ७, शिरसाळा येथील २१, मंगरूळपीर येथील पोस्ट ऑफिस रोड परिसरातील १, शेगी येथील १, कारंजा लाड शहरातील भारतीपुरा येथील १, गायत्री मंदिर परिसरातील ५, किन्ही रोड बायपास परिसरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दरम्यान, अमरावती येथे उपचार घेत असलेल्या कारंजा लाड शहरातील ७० वर्षीय व्यक्तीचा ६ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला असून त्याची नोंद आज घेण्यात येत आहे.
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह –१०८८
ऍक्टिव्ह – ३७०
डिस्चार्ज – ६९८
मृत्यू – १९ (+१)
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME