प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा अकोला,दि. 4 (युगनायक न्युज नेटवर्क)- जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधी व खर्चाचा सर्व विभागाचा आढावा आज घेण्यात आला. प्राप्त निधीचा प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी यंत्रणांना दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित आढावा बैठकीत ना. कडू बोलत होते. यावेळी आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी शास्त्री, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. कुस...
धन्यवाद सर.
ReplyDelete