ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी करावी -सौ.किरणताई गि-हे
यासाठी जिल्हाधिकारी मार्फ़त राष्ट्रपतीना दिले निवेदन .
वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आदरणीय श्रध्येय एड.प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश सदस्य सौ.किरणताई गि-हे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी साहेब जिल्हा वाशिम मार्फत सन्माननीय राष्ट्रपतीना निवेदन देण्यात आले.देशामध्ये ओबिसी समाजाला मंडल कमीशन आयोगानुसार 27 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली असून मेडिकलच्या पदवीधर व पदवीत्तर स्तरावरील अभ्यासक्रमामध्ये प्रवेश प्रक्रियेती ल आरक्षण नाकारण्यात आले आहे.या प्रवेश प्रक्रियेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात असणाऱ्या वैद्यकीय संस्थाना ओबीसी आरक्षण लागू केले नाही.त्यामुळे हा परिणाम झाला आहे.तरी शासनाच्या या आरक्षण विरोधी आरक्षणाबाबत मंडल कमीशन नुसार 27% आरक्षण पूर्ववत ठेवण्यात यावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी,महिला आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेश सदस्या सौ.किरणताई गि-हे, यांनी दिला.या वेळी नागसेन सुरवाड़े,प्रा.सुभाष अंभोरे, प्रा.ऊके,राजेश इंगले,विनोद अंभोरे,सम्यक चे जिल्हाध्यक्ष पारितोष इंगोले,महासचिव सिंहल पठाड़े,विर्पिन इंगोले,नागसेन धांडे, सौ.सविताताई इंगले इत्यादी हजर होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME