नाशिक जिल्ह्यात उद्या रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू मास्कचा वापर न केल्यास होणार एक हजार रुपयांचा दंड : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक जिल्ह्यात उद्या रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू मास्कचा वापर न केल्यास होणार एक हजार रुपयांचा दंड : पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक दिनांक 21 ( जिमाका वृत्तसेवा ) - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उद्या रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. तसेच सर्वांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असून मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील कोविड 19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भुजबळ फार्म येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी जि...