प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजा चा वापर टाळा- युग गुरु शिक्षण संस्थेचे जनतेला आवाहन
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजा चा वापर टाळा- युग गुरु शिक्षण संस्थेचे जनतेला आवाहन
-अध्यक्ष-अॅड.भारत गवळी
रिसोड:-दिनांक २४/१/२०२१(भारत कांबळे)
वाशिम जिल्ह्यातील सर्व जनतेला युग गुरु बहु. शिक्षण संस्था रिठद तालुका रिसोड च्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, आपल्या सभोवताली जर जमिनीवर, कचऱ्यात आपला राष्ट्रीय ध्वज टाकु नये याची काळजी घ्यावी तसेच कुठल्याही ठिकाणी जर आपला राष्ट्रीय ध्वज पडलेला दिसल्यास त्याला त्वरीत उचलावे आणि आपल्या ध्वजाचा अपमान होऊ देऊ नये, घरातील लहान मुले जर प्लास्टिक किंवा कागदी राष्ट्रीय ध्वजाची मागणी करत असतील तर त्यांना त्यांना प्लास्टिक व कागदी राष्ट्रीय ध्वज देऊ नये कारण त्यांना त्यांच्या कडून ध्वजाचा अपमान होऊ शकतो तसेच जनतेने २६ जानेवारीला आपण जिथे असाल त्या ठिकाणी जर आपल्या कानावर राष्ट्रीय गीत आल्यास तिथेच असाल त्या परिस्थितीत सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रीय गीताचा सन्मान करा. असे आवाहन संस्थेच्या वतीने युग गुरु शिक्षण संस्थेचे -अॅड.भारत गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME