नारी शक्ती पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित
नारी शक्ती पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित
वाशिम, दि. २८ : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या नारी शक्ती पुरस्काराकरिता प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत. व्यक्ती अथवा संस्थेला ३१ जानेवारी २०२१ पर्यंत www.narishaktipuraskar.wcd.
वैयक्तिक पुरस्काराकरिता अर्जदाराचे वय हे पुरस्कार वर्षाच्या १ नोव्हेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण असावे. अर्जदार संस्था असेल तर संबंधित क्षेत्रात किमान ५ वर्षांचा कार्यरत असावी. अर्जदाराने हा पुरस्कार किंवा स्त्री शक्ती पुरस्कार या पूर्वी प्राप्त केलेला नसावा. दरवर्षी २० फेब्रुवारी रोजी सदर पुरस्कार प्राप्तकर्त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येवून ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME