SBI-RSETI वाशिम अंतर्गत निवासी शिवणकाम (महिला ) व ब्युटी पार्लर प्रशिक्षणास प्रारंभ

 SBI-RSETI वाशिम अंतर्गत निवासी शिवणकाम (महिला ) व ब्युटी पार्लर प्रशिक्षणास प्रारंभ




भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, वाशीम द्वारा  वाशिम येथे निवासी महिला शिवणकाम व ब्युटी पार्लर प्रशिक्षणास सुरुवात झाली असून सदर प्रशिक्षणास शिवणकाम मध्ये 35 व ब्युटी पार्लर प्रशिक्षणास 30 महिला प्रशिक्षण  घेणार आहेत . सदर  प्रशिक्षण तीस दिवस चालणार  आहे. उद्घाटनाप्रसंगी RSETI संचालक चंदन गवई बोलताना म्हणाले की या प्रशिक्षणातून आपला आर्थिक व्यवहार कसा उंचावेल आणि भावी जीवनात हे प्रशिक्षण कसे उपयोगात येईल आम्ही आपले आर्थिक स्थिती कशी उंचावेल याचे गांभीर्य ठेवून प्रशिक्षण घ्यावे तसेच आर सिटी च्या नियमावली व अटीचे पालन करावे.

 भारतीय स्टेट बँक RSETI च्या वतीने महिलांकरिता स्वयं रोजगार आणि कौशल्य विकास  अंतर्गत सदर कार्यक्रम भारतीय स्टेट बँक RSETI मार्फत मोफत आयोजित केला होता आणि प्रशिक्षण कालावधी मध्ये प्रशिक्षणार्थ्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था मोफत करण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला RSETI संचालक चंदन गवई ,  गुलाब साबळे, खिल्लारी ,  योगेश चव्हाण ,राजेंद्र पडघान महेंद्र  सम्रत महादेव भोयर  हे उपस्थित होत. भारतीय स्टेट बँक RSETI वाशिम द्वारा अशा अनेक स्वयंरोजगाराभिमुख कौशल विकास अंतर्गत विविध निवासी आणि अनिवासी प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात येत असते ज्या यामध्ये  मसाला बनविणे, कागदी आणि कापडी बॅग बनविणे, शेळी संगोपन, कुकुटपालन, मोबाईल दुरुस्ती,दुचाकी वाहन दुरुस्ती, घरगुती उपकरन दुरुस्ती इत्यादी प्रशिक्षण मोफत आयोजित केले जातात ज्या मध्ये जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा मोफत केली जाते. या सर्व प्रशिक्षणाचा ग्रामीण भागातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील बेरोजगार युवक युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन RSETI  संचालक चंदन गवई यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू