"महाराष्ट्रातील मातंग समाजाचा सामुहिक धर्मांतराचा निर्णय" "राज्यव्यापी परिषदेत निर्णय"
"महाराष्ट्रातील मातंग समाजाचा सामुहिक धर्मांतराचा निर्णय"
"राज्यव्यापी परिषदेत निर्णय"
( औरंगाबाद प्रतिनिधी )
राज्यात मातंग समाजावर भेदभावातून होत असलेला अन्याय,अत्याचार,छळ, भेदाभेद रोखण्यासाठी मातंग समाजाने मोठ्या प्रमाणावर सामुहिक धर्मांतर करण्याचा निर्णय नुकताच औरंगाबाद येथे झालेल्या राज्यव्यापी परिषदेत घेतला असल्याची माहिती मातंग समाज धर्मांतर परिषदेचे मुख्य निमंत्रक मा. गोविंदकुमार चिंचोलीकर यांनी दिली आहे.
औरंगाबाद येथे दि.६ व ७ फेब्रु.२०२१ रोजी मातंग समाजाची दोन दिवसीय राज्यव्यापी सामुहिक धर्मांतर परिषद घेण्यात आली होती, या परिषदेत मातंग समाजाने सामुहिक धर्मांतर करावे काय ? करावे तर का करावे ? करू नये तर का करु नये? आणि हिंदू धर्मात मातंग समाजाचे अस्तित्व काय आहे ? या विषयावर सखोल चिंतन आणि चर्चा करण्यात आली. यावेळी बहुतांशी विचारवंतांनी बौध्द धम्म का स्वीकारू नये ? या विषयावर लिखित स्वरुपात आपल्या व्यापक व अभ्यासपूर्ण अशा भूमिका मांडल्या. या परिषदेस महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून मातंग समाजाचे बुद्धीजीवी, अभ्यासक, विचारवंत, कार्यकर्ते, तसेच अधिकारी उपस्थित होते. यामध्ये दिल्लीचे रिटायर्ड चीफ एक्झेकेटीव्ह ऑफिसर मा.एस.एन.गायकवाड साहेब, मा. प्रभाकरजी शिंदे नागपूर, मा. इंजिनियर बळीराम किन्हाळकर औरंगाबाद, ज्येष्ठ समाजसेवक मा. बी.एस. कांबळे पाथरीकर, लेखक विचारवंत, मा. के. जे. गाधेकर लातूर, अभ्यासक मा. रघुनाथ देन्डे, औरंगाबाद, प्रसिद्ध साहित्यिक, मा.डाॅ.धोंडोपंत मानवतकर जालना, मा. सतीशभाऊ कसबे उस्मानाबाद, अरुण कांबळे, औरंगाबाद मा. एस. एन. गायकवाड़ दिल्ली, आदीं विचारवंतांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
" मातंग समाज सामुहिक धर्मांतर" हा विषय सर्वदूर पोहचवण्यासाठी महाराष्ट्रात सात प्रशासकीय बैठकांचे नियोजन यावेळी करण्यात आले. धर्मांतर निर्णय प्रक्रियेच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावर चार समित्या गठित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अखिल भारतीय धर्मांतर कृती समिती,धर्मांतरविषयक अभ्यास समिती, कायदेविषयक सल्लागार समिती, धर्मांतर सल्लागार समिती. अशा समित्यांचा अंतर्भाव आहे.
या परिषदेच्या अध्यक्षपदी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयातील वरिष्ठ विधिज्ञ मा.अॅड. दयानंद भांगे, हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून दिल्ली चे रिटायर्ड चीफ एक्झेकेटीव्ह ऑफिसर मा.एस.एन.गायकवाड साहेब यांची आवर्जून उपस्थिती होती.
या कार्यक्रमात नियोजित विषयावर महाराष्ट्रातील मातंग समाजातील बुध्दिजीवी मान्यंवरांनी आपले विचार मांडले. "हिन्दू धर्म आमचा धर्म नाही"
आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. आम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या मानवतावादी धर्माची गरज आहे. यावेळी बहुतेक विचारवंतांनी बौद्ध धम्म का स्विकारु नये" असे आपलें लेखी मनोगत व्यक्त केले.
याकार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून मोठ्या संखेने बुध्दिजीवी मान्यंवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक मा. गोविन्दकुमारजी चिंचोलीकर यांनी प्रास्ताविकात या परिषदेची विस्तारपपूर्वक भूमिका विषद केली. अनेक विचारवंतांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनानंतर शेवटी या परिषदेचे अध्यक्ष मा. अॅड. दयानंद भांगे साहेब यांनी मातंग समाजाला सामुहिक धर्मांतराची गरज यावर उत्कृष्ट असे सखोल मार्गदर्शन केले.
शेवटी कार्यक्रमाचे निंमत्रक मा. गोविन्दकुमार चिंचोलीकर यांनी शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल उपस्थित मान्यंवराचे आभार मानले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME