स्वयंरोजगार स्थापना आणि प्रगती करिता आरसेटी प्रशिक्षण व आर्थिक साक्षरता महत्वपूर्ण.
स्वयंरोजगार स्थापना आणि प्रगती करिता आरसेटी प्रशिक्षण व आर्थिक साक्षरता महत्वपूर्ण.
भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नांदेड द्वारा ग्रामीण भागातील बेरोजगार व्यक्तींकरिता स्वयं रोजगार आणि कौशल्य विकास अंतर्गत दिनांक 21 जानेवारी पासून आयोजित दहा दुग्ध व्यवसाय आणि गांढुळ खत निर्मिती प्रशिक्षणाचे अर्धापुर तालुक्यातील ग्राम पाटनूर येथे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणा मध्ये दुग्ध व्यवसाय संबंधी तसेच वैक्तिमत्व विकास आणि उद्योजकता विकासाचे, कार्यप्रेरणा, आर्थिक साक्षरता इत्यादींचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार असून, विविध कार्यक्रम, खेळ आणि क्षेत्र भेटी द्वारा त्यांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करण्यात येत असते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय स्टेट बँक आरसेटी मार्फत आयोजित केला असून प्रशिक्षण कालावधी मध्ये प्रशिक्षणार्थ्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले, उदघाटन समारंभाला ऋषिकेश कोंडेकर, संसाधन व्यक्ती-सेबी, कुसुमताई बाळकृष्ण काळे, काशीबाई संभाजी काळे, आरसेटी संचालक प्रदीप पाटील, प्रशिक्षक आणि कार्यक्रम समन्वयक आशिष राऊत हे उपस्थित होते. उदघाटनपर मार्गदर्शन तसेच आर्थिक साक्षरता याविषयी मार्गदर्शन करतांना कोंडेकर यांनी स्वयं रोजगार सुरू करण्याकरिता आरसेटी प्रशिक्षणाचे आणि स्वयं रोजगार यशस्वी सुरू ठेवण्याकरीता आर्थिक साक्षरतेचे महत्व विषद केले. भारतीय स्टेट बँक आरसेटी नांदेड द्वारा अशा अनेक स्वयंरोजगाराभिमुख कौशल विकास अंतर्गत विविध निवासी आणि अनिवासी प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात येत असते ज्या यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर, पापड मसाला बनविणे, कागदी आणि कापडी बॅग बनविणे, शेळी संगोपन, कुकुटपालन, मोबाईल दुरुस्ती,दुचाकी वाहन दुरुस्ती, घरगुती उपकरन दुरुस्ती इत्यादी प्रशिक्षण मोफत आयोजित केले जातात ज्या मध्ये जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था सुद्धा मोफत केली जाते. या सर्व प्रशिक्षणाचा ग्रामीण भागातील अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील बेरोजगार युवक युवतींनी लाभ घेण्याचे आव्हाहन संचालक प्रदीप पाटील यांनी केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME