वाशिम जिल्ह्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
वाशिम जिल्ह्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
वाशिम, दि. २५ (युगनायक न्युज नेटवर्क) : जिल्ह्यातील सन २०२०-२०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार संबंधित तालुकास्तरावर २ फेब्रुवारी २०२१ रोजी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे.
महिला आरक्षण सोडतीसाठी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत होणार आहे. तरी इच्छुकांनी सदर सोडतीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME