सेवानिवृत अंगणवाड़ी सेविका,मदतनिस व मिनी अंगणवाड़ी यांच्या न्याय हक्काची एल आय सी त्वरीत दया-आयटक संघटना

 सेवानिवृत अंगणवाड़ी सेविका,मदतनिस व मिनी अंगणवाड़ी यांच्या न्याय हक्काची एल आय सी त्वरीत दया-आयटक संघटना

वाशिम:(युगनायक न्युज नेटवर्क)

महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अंगणवाड़ी सेविका,मदतनिस,नवीन मिनी अंगणवाड़ी सेविका यांना संदर्भानुसार नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्ति/मृत्यु नंतर देय न्याय हक्कची एल आय सी मार्फत एकमुश्त रक्कमदेण्याबात शाषन निर्णय/परिपत्रक(जि आर)संदर्भानुसार पारीत केला आहे.महाराष्ट्र राज्यातील ईतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सदर एल आय सी ची रक्कम अदा करण्यात आली आहे परंतु फक्त वाशिम जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका अजुन पर्यंत एल आय सी च्या रकमेचा लाभ मिळाला नाही. या पूर्वी संबधितांना वरिष्ठ स्तरावर अनेक निवेदन सादर केले परंतु सातत्त्याने दुर्लक्षित करण्यात आले आहे. न्याय हक्काच्या लाभाच्या रकमेपासुन वंचित ठेवन्यात आले आहे. याबाबत गांभीर्याने दखल घेण्यात यावी लाभार्थ्यांना एल आय सी ची रक्कम मिळवून दयावी .अन्यथा न्याय हक्कासाठी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन ,आमरण उपोषण, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याबाबतचीसर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र प्रशासन व वाशिम जिल्हा प्रशासनावर अवलंबून असेल या आशयाचे निवेदन उपमुख्यकार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग जि प ता. जि. वाशिम यांना आयटक संघनेचे कार्याध्यक्ष कॉ. दिगाम्बर अंभोरे, जिल्हाध्यक्ष सविता इंगळे, सचिव मालती राठोड तथा तालुकाध्यक्ष किरणताई गि-हे यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू