Posts

नाशिक जिल्ह्यात उद्या रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू मास्कचा वापर न केल्यास होणार एक हजार रुपयांचा दंड : पालकमंत्री छगन भुजबळ

Image
नाशिक जिल्ह्यात उद्या रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू मास्कचा वापर न केल्यास होणार एक हजार रुपयांचा दंड  : पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक   दिनांक   21 ( जिमाका   वृत्तसेवा )   - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उद्या रात्री 11 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. तसेच सर्वांना मास्कचा वापर करणे बंधनकारक असून मास्कचा वापर न केल्यास एक हजार रुपयांचा दंड करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील कोविड 19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भुजबळ फार्म येथे आयोजित बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी जि...

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (RIMC) प्रवेश पात्रता परीक्षा ५ जून रोजी

Image
  राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून (RIMC) प्रवेश पात्रता परीक्षा ५ जून रोजी १५ एप्रिलपर्यंत अर्ज जमा करण्याचे आवाहन मुंबई, दि. 15 :  महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून येथे इ. 8 वीसाठी प्रवेशपात्रता परीक्षा’ दि. 05 जून 2021 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे. या परीक्षेसाठी  परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे दि. 15 एप्रिल 2021 पर्यंत जमा करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केले आहे.   प्रवेश वयाची अट : या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांचे वय दि. 1 जानेवारी 2022 रोजी 11 ( अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी व 13 (तेरा) वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी परीक्षेस पात्र समजण्यात येतील. म्हणजेच विद्यार्थ्यांचा जन्म दि. 2 जानेवारी 2009 च्या आधी आणि दि. 1 जुलै 2010 च्या नंतरचा नसावा. (म्हणजेच विद्यार्थ्याचा जन्म दि. 2 जानेवारी 2009...

"महाराष्ट्रातील मातंग समाजाचा सामुहिक धर्मांतराचा निर्णय" "राज्यव्यापी परिषदेत निर्णय"

Image
 "महाराष्ट्रातील मातंग समाजाचा सामुहिक धर्मांतराचा निर्णय" "राज्यव्यापी परिषदेत निर्णय" ( औरंगाबाद प्रतिनिधी )            राज्यात मातंग समाजावर भेदभावातून होत असलेला अन्याय,अत्याचार,छळ, भेदाभेद रोखण्यासाठी मातंग समाजाने मोठ्या प्रमाणावर सामुहिक धर्मांतर करण्याचा निर्णय नुकताच औरंगाबाद येथे झालेल्या राज्यव्यापी परिषदेत घेतला असल्याची माहिती मातंग समाज धर्मांतर परिषदेचे मुख्य निमंत्रक मा. गोविंदकुमार चिंचोलीकर यांनी दिली आहे.         औरंगाबाद येथे दि.६ व ७ फेब्रु.२०२१ रोजी मातंग समाजाची दोन दिवसीय राज्यव्यापी सामुहिक धर्मांतर परिषद घेण्यात आली होती, या परिषदेत मातंग समाजाने सामुहिक धर्मांतर करावे काय ? करावे तर का करावे ? करू नये तर का करु नये? आणि हिंदू धर्मात मातंग समाजाचे अस्तित्व काय आहे ? या विषयावर सखोल चिंतन आणि चर्चा करण्यात आली. यावेळी बहुतांशी विचारवंतांनी बौध्द धम्म का स्वीकारू नये ? या विषयावर लिखित स्वरुपात आपल्या व्यापक व अभ्यासपूर्ण अशा भूमिका मांडल्या. या परिषदेस महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून मातंग समाजाचे बुद्धी...

‘वाशिम जिल्हा स्टार्टअप : बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’चे आयोजन

Image
  ‘वाशिम जिल्हा स्टार्टअप : बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’चे आयोजन ·          स्टार्ट-अप संस्कृतीचा विकास करण्यासाठी उपक्रम ·          १५ मार्चपर्यंत प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार वाशिम ,  दि. ०५ :   जिल्ह्यात स्टार्ट-अप संस्कृतीचा विकास करण्यासाठी व नाविन्यपूर्ण संकल्पनांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून  ‘ वाशिम जिल्हा स्टार्टअप : बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन २०२१ ’  या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिम जिल्हा नाविन्यता परिषदेच्यावतीने व संत गाडगे बाबा विद्यापीठ रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन सेंटरद्वारा वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये १७ व १८ मार्च २०२१ रोजी ही स्पर्धा घेण्याचे नियोजित असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा नाविन्यता परिषदेचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी दिली. जिल्ह्याच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याकरि...

सेवानिवृत अंगणवाड़ी सेविका,मदतनिस व मिनी अंगणवाड़ी यांच्या न्याय हक्काची एल आय सी त्वरीत दया-आयटक संघटना

Image
  सेवानिवृत अंगणवाड़ी सेविका,मदतनिस व मिनी अंगणवाड़ी यांच्या न्याय हक्काची एल आय सी त्वरीत दया-आयटक संघटना वाशिम:( युगनायक न्युज नेटवर्क ) महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अंगणवाड़ी सेविका,मदतनिस,नवीन मिनी अंगणवाड़ी सेविका यांना संदर्भानुसार नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्ति/मृत्यु नंतर देय न्याय हक्कची एल आय सी मार्फत एकमुश्त रक्कमदेण्याबात शाषन निर्णय/परिपत्रक(जि आर)संदर्भानुसार पारीत केला आहे.महाराष्ट्र राज्यातील ईतर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना सदर एल आय सी ची रक्कम अदा करण्यात आली आहे परंतु फक्त वाशिम जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका अजुन पर्यंत एल आय सी च्या रकमेचा लाभ मिळाला नाही. या पूर्वी संबधितांना वरिष्ठ स्तरावर अनेक निवेदन सादर केले परंतु सातत्त्याने दुर्लक्षित करण्यात आले आहे. न्याय हक्काच्या लाभाच्या रकमेपासुन वंचित ठेवन्यात आले आहे. याबाबत गांभीर्याने दखल घेण्यात यावी लाभार्थ्यांना एल आय सी ची रक्कम मिळवून दयावी .अन्यथा न्याय हक्कासाठी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन ,आमरण उपोषण, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याबाबतचीसर्वस्वी जबाबदा...

निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसाठी नव्या कार्यक्रमानुसार १२ मार्चला मतदान

Image
निवडणुका रद्द झालेल्या ग्रामपंचायतींसाठी नव्या कार्यक्रमानुसार १२ मार्चला मतदान   मुंबई, दि. 4 : विविध कारणांमुळे निवडणूक रद्द केलेल्या नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) व कातरणी (ता. येवला), नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) आणि अहमदनगर जिल्ह्यातील वाकी (ता. जामखेड) ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नव्या कार्यक्रमानुसार 12 मार्च 2021 रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर साकत (ता. जामखेड) ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. 2 साठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. श्री. मदान यांनी सांगितले की, उमराणे, कातरणी आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार होते; परंतु सदस्य व सरपंचपदांच्या लिलावप्रकरणी या तिन्ही ठिकाणी निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्याचबरोबर वाकी ग्रामपंचायतीची आणि साकत ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र.2 मधील निवडणूक निष्पक्षपणे पार न पडल्यामुळे रद्द करण्यात आली होती. आता या सर्वांसाठी नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार 16 ते 23 फेब्रुवारी 2021 या कालावधीत नामनिर्देशन...

SBI-RSETI वाशिम अंतर्गत निवासी शिवणकाम (महिला ) व ब्युटी पार्लर प्रशिक्षणास प्रारंभ

Image
  SBI-RSETI वाशिम अंतर्गत निवासी शिवणकाम (महिला ) व ब्युटी पार्लर प्रशिक्षणास प्रारंभ भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, वाशीम द्वारा  वाशिम येथे निवासी महिला शिवणकाम व ब्युटी पार्लर प्रशिक्षणास सुरुवात झाली असून सदर प्रशिक्षणास शिवणकाम मध्ये 35 व ब्युटी पार्लर प्रशिक्षणास 30 महिला प्रशिक्षण  घेणार आहेत . सदर  प्रशिक्षण तीस दिवस चालणार  आहे. उद्घाटनाप्रसंगी RSETI संचालक चंदन गवई बोलताना म्हणाले की या प्रशिक्षणातून आपला आर्थिक व्यवहार कसा उंचावेल आणि भावी जीवनात हे प्रशिक्षण कसे उपयोगात येईल आम्ही आपले आर्थिक स्थिती कशी उंचावेल याचे गांभीर्य ठेवून प्रशिक्षण घ्यावे तसेच आर सिटी च्या नियमावली व अटीचे पालन करावे.  भारतीय स्टेट बँक RSETI च्या वतीने महिलांकरिता स्वयं रोजगार आणि कौशल्य विकास  अंतर्गत सदर कार्यक्रम भारतीय स्टेट बँक RSETI मार्फत मोफत आयोजित केला होता आणि प्रशिक्षण कालावधी मध्ये प्रशिक्षणार्थ्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था मोफत करण्यात आली. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाला RSETI संचालक चंदन गवई ,  गुलाब स...

नारी शक्ती पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित

Image
  नारी शक्ती पुरस्कारासाठी ३१ जानेवारीपर्यंत प्रस्ताव आमंत्रित वाशिम ,  दि. २८ :  केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या नारी शक्ती पुरस्काराकरिता प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत. व्यक्ती अथवा संस्थेला ३१ जानेवारी २०२१ पर्यंत  www.narishaktipuraskar.wcd. gov.in  किंवा  www.wcd.nic.in  या संकेतस्थळावर आपले प्रस्ताव ऑनलाईन स्वरुपात सादर करता येतील.   प्रस्ताव केवळ ऑनलाईन स्वरूपातच स्वीकारले जाणार आहेत.   ३१ जानेवारी नंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. वैयक्तिक पुरस्काराकरिता अर्जदाराचे वय हे पुरस्कार वर्षाच्या १ नोव्हेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण असावे. अर्जदार संस्था असेल तर संबंधित क्षेत्रात किमान ५ वर्षांचा कार्यरत असावी. अर्जदाराने हा पुरस्कार किंवा स्त्री शक्ती पुरस्कार या पूर्वी प्राप्त केलेला नसावा. दरवर्षी २० फेब्रुवारी रोजी सदर पुरस्कार प्राप्तकर्त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येवून ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. याबाबतची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पुरस्क...

कवठा येथील महिलांच्या सोलर एनर्जी कंपनीचा शुभारंभ

Image
महाराष्ट्राला भूषणावह ठरेल अशी यशोगाथा निर्माण केली – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार कवठा येथील महिलांच्या सोलर एनर्जी कंपनीचा शुभारंभ मागासवर्गीय महिलांनी उभारलेला राज्यातील पहिलाच प्रकल्प वर्धा, दि 26 (जिमाका):- सावित्रीबाई फुलेंनी मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला, त्यावेळी त्यांच्यावर चिखल आणि दगडांचा मारा झाला होता. त्यांनी झेललेल्या संकटापेक्षा तुम्ही केलेले कष्ट कमी असले तरी सावित्रीबाई फुले यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन त्यांचेच स्वप्न साकार करीत आहात. ग्रामीण भागातील महिलांनी निर्माण केलेली वेगळ्या प्रकारच्या उद्योगाची ही यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे ,असे प्रतिपादन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी केले वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कवठा झोपडी या गावात मागासवर्गीय महिलांनी तेजस्वी सोलर एनर्जी को-ऑपरेटिव्ह संस्था निर्माण करून या माध्यमातून सोलर पॅनल निर्मितीचा उद्योग उभारला आहे. आज याचा शुभारंभ पालकमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोल...

वाशिम जिल्ह्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

Image
  वाशिम जिल्ह्यातील सरपंच पदाच्या  आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर वाशिम ,   दि. २५ (युगनायक न्युज नेटवर्क) :   जिल्ह्यातील सन २०२०-२०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार संबंधित तालुकास्तरावर २ फेब्रुवारी २०२१ रोजी आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. महिला आरक्षण सोडतीसाठी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आरक्षण सोडत होणार आहे. तरी इच्छुकांनी सदर सोडतीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजा चा वापर टाळा- युग गुरु शिक्षण संस्थेचे जनतेला आवाहन

Image
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजा चा वापर टाळा- युग गुरु शिक्षण संस्थेचे जनतेला आवाहन   -अध्यक्ष-अॅड.भारत गवळी रिसोड:-दिनांक २४/१/२०२१(भारत कांबळे) वाशिम जिल्ह्यातील सर्व जनतेला युग गुरु बहु. शिक्षण संस्था रिठद तालुका रिसोड च्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येते की, आपल्या सभोवताली जर जमिनीवर, कचऱ्यात आपला राष्ट्रीय ध्वज टाकु नये याची काळजी घ्यावी तसेच कुठल्याही ठिकाणी जर आपला राष्ट्रीय ध्वज पडलेला दिसल्यास त्याला त्वरीत उचलावे आणि आपल्या ध्वजाचा अपमान होऊ देऊ नये, घरातील लहान मुले जर प्लास्टिक किंवा कागदी राष्ट्रीय ध्वजाची मागणी करत असतील तर त्यांना त्यांना प्लास्टिक व कागदी राष्ट्रीय ध्वज देऊ नये  कारण त्यांना त्यांच्या कडून ध्वजाचा अपमान होऊ शकतो तसेच जनतेने २६ जानेवारीला आपण जिथे असाल त्या ठिकाणी जर आपल्या कानावर राष्ट्रीय गीत आल्यास तिथेच असाल त्या परिस्थितीत सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रीय गीताचा सन्मान करा. असे  आवाहन संस्थेच्या वतीने युग गुरु शिक्षण संस्थेचे -अॅड.भारत गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.

स्वयंरोजगार स्थापना आणि प्रगती करिता आरसेटी प्रशिक्षण व आर्थिक साक्षरता महत्वपूर्ण.

Image
स्वयंरोजगार स्थापना आणि प्रगती करिता आरसेटी प्रशिक्षण व आर्थिक साक्षरता महत्वपूर्ण. भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण संस्था, नांदेड द्वारा ग्रामीण भागातील बेरोजगार व्यक्तींकरिता स्वयं रोजगार आणि कौशल्य विकास अंतर्गत दिनांक 21 जानेवारी पासून आयोजित दहा  दुग्ध व्यवसाय आणि गांढुळ खत निर्मिती प्रशिक्षणाचे अर्धापुर तालुक्यातील ग्राम पाटनूर येथे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणा मध्ये दुग्ध व्यवसाय संबंधी तसेच वैक्तिमत्व विकास आणि उद्योजकता विकासाचे, कार्यप्रेरणा, आर्थिक साक्षरता इत्यादींचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार असून, विविध कार्यक्रम, खेळ आणि क्षेत्र भेटी द्वारा त्यांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करण्यात येत असते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम भारतीय स्टेट बँक आरसेटी मार्फत आयोजित केला असून प्रशिक्षण कालावधी मध्ये प्रशिक्षणार्थ्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले, उदघाटन समारंभाला ऋषिकेश कोंडेकर, संसाधन व्यक्ती-सेबी, कुसुमताई बाळकृष्ण काळे, काशीबाई संभाजी काळे, आ...

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२०’ अंतर्गत विविध पदांची भरती

Image
  स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ‘संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२०’ अंतर्गत विविध पदांची भरती परीक्षेचे नाव :  स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त पदवी स्तर परीक्षा २०२० एकूण जागा :  ६५०६ पदाचे नाव : गट ब १. सहायक लेखापरीक्षण अधिकारी (असिस्टंट ऑडिट ऑफिसर) २. सहायक लेखा अधिकारी (असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर) ३. सहायक कक्ष अधिकारी (असिस्टंट सेक्शन ऑफिसर) ४. सहायक (असिस्टंट) ६. आयकर निरीक्षक ७. निरीक्षक ८. सहायक सक्तवसुली अधिकारी (असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर) ९. उपनिरीक्षक (सब इंस्पेक्टर) १०. सहायक/ अधीक्षक (असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट) ११. विभागीय लेखापाल (डिविजनल अकाउंटंट) १२. उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) १३. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी गट क १४. लेखा परीक्षक (ऑडिटर) १५. लेखापाल (अकाउंटेंट) १६. कनिष्ठ लेखापाल (ज्युनियर अकाउंटंट) १७. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक १८. कर सहाय्यक १९. उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) शैक्षणिक पात्रता :  कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी : पदवी व बारावीत गणितामध्ये किमान ६०% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. उर्वरित पदे : कोणत्याही शाखेतील पदवी. परीक्षा शुल्क...

संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी

Image
  मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी – मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी मुख्यमंत्री लिहिणार पंतप्रधानांना पत्र, राज्यातील खासदारही भेटीस जाणार सर्व पक्षीय   नेत्यांना सहकार्याचे आवाहन मुंबई, दि. ८ :  मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी इंद्रा साहनी प्रकरणाच्या निवाड्यातील ५० टक्क्यांची मर्यादा आणि १०२ व्या घटनादुरूस्तीचा राज्य सरकारांच्या अधिकारांवरील परिणाम आदी संवैधानिक व न्यायालयीन बाबींवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक पद्धतीने बाजू मांडावी, असे आवाहन मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना श्री.चव्हाण बोलत होते. सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आरक्षणाच्या खटल्यातील संवैधानिक पेच केंद्र सरकारच्या पातळीवरच सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असून, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधानांना पत्र ...

बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका

Image
बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांचे आवाहन   मुंबई, दि. ९ :  राज्यात बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत. काही समस्या असेल तर पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरित संपर्क करुन त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी जनतेस केले आहे. श्री.केदार म्हणाले, मुंबई येथे ३ कावळे, ठाणे येथे १५ बगळे (इंग्रेटस) व २ पोपट या पक्षांचे तसेच परभणी येथे एका कुक्कुटपालन फार्ममधील ८०० पक्षांचे, दापोली येथे ६ कावळे व बीड येथे ११ कावळ्यांचे मृत्यू झाल्याचे आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासण्यांचे काम सुरू आहे. तसेच सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील निशाद प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास ४८ ते ७२ तास लागू शकतात. श्री. केदार यांनी सर्व पोल्ट्रीधारक तसेच सर्वसामान्य जनतेस कळविले की, राज्यातील कोणत्याही गावामध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलां...

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न   पुणे, दि. 9 : ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा, अशी सदिच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली(ऑनलाईन) तर ज्येष्ठ नेते तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'तांत्रिक कार्यक्षमता अहवाल', 'आसवनी अहवाल' चे प्रकाशन आणि साखर संघाच्या 'दिनदर्शिका-2021' चे प्रकाशन करण्यात आले. सभेस कामगारमंत्री तथा संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजयसिंह...

शोकाकुल मातांची आसवं पुसायला मुख्यमंत्री आले सोनझारी वस्तीत!

Image
  शोकाकुल मातांची आसवं पुसायला मुख्यमंत्री आले सोनझारी वस्तीत! सर्वसामान्यांच्या वेदनेशी एकरूप होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या भावनिकतेचे अनोखे दर्शन नागपूर, दि. 10 : भंडारा जिल्हा रुग्णालयास लागलेल्या आगीत आपली बाळं गमावलेल्या मातांच्या सांत्वनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज स्वतः भोजापूर गावातील सोनझारी वस्तीत आले! अशा भीषण दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रच जणू आपल्या पाठीशी असल्याचा दिलासा आज या दोन्ही मातांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः भेटून दिला! भंडारा येथील या भीषण घटनेत भोजापूर जवळच्या सोनझारी येथील गीता बेहरे यांची अवघ्या महिनाभराची मुलगी दगावली. शहराजवळ असलेल्या भोजापूर गावातील सोनझारी ही अवघ्या पाचसहाशेची वस्ती. या वस्तीत बेहरे कुटुंबीय राहतात. मोलमजुरी करून ते आपली उपजीविका करतात. गीता आणि विश्वनाथ यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झालेला. मृत बालिका हे त्यांचे पहिलेच अपत्य. जन्मत:च बाळाचे वजन अत्यंत कमी असल्याने तिला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथे गेले दोन महिने तिच्यावर उपचार सुरू होते. चांगल्या उपचारांमुळे तिच्या प...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा  कोरोना_अलर्ट (दि. ११ जानेवारी २०२१, सायं. ५.०० वा.) वाशिम जिल्ह्यात आणखी १६ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील योजना कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पिंपळगाव येथील २, रिसोड शहरातील २, मोहजा येथील १, भोकरखेडा येथील २, पळसखेड येथील १, मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील १, मंगरुळपीर शहरातील जांब रोड येथील १, कारंजा शहरातील महसूल कॉलनी येथील  १, शहरातील इतर ठिकाणची १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर २ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच  ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ६७७२ ऍक्टिव्ह – १०६ डिस्चार्ज – ६५१४ मृत्यू – १५१ (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
  वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट (दि. ०९ जानेवारी २०२१, सायं. ५.०० वा.) #वाशिम जिल्ह्यात आणखी ११ कोरोना बाधित काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गणेश पेठ येथील १, ग्रीन पार्क कॉलनी परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, केकतउमरा येथील २, रिसोड शहरातील शिवाजी चौक परिसरातील १, भोकरखेडा येथील १, मंगरुळपीर शहरातील पंचशील नगर येथील १, शेलूबाजार येथील २, मोहरी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच ८ जणांना डिस्चार्ज देण्यात  आला आहे.   कोरोना बाधितांची सद्यस्थिती एकूण पॉझिटिव्ह – ६७५६ ऍक्टिव्ह – ९९ डिस्चार्ज – ६५०५ मृत्यू – १५१ (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

१२ जानेवारीपासून जिल्ह्यात युवा सप्ताहाचे आयोजन

  १२ जानेवारीपासून जिल्ह्यात युवा सप्ताहाचे आयोजन वाशिम ,  दि. ०८ (जिमाका) :  क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १९ जानेवारी २०२१ या कालावधीत जिल्ह्यात युवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध स्पर्धा, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. १२ जानेवारी रोजी सप्ताहाचे उद्घाटन होणार असून स्वामी विवेकानंद यांचे कार्य, तत्वज्ञान व विचार याबाबत युवांचे प्रबोधन, युवाबाबत उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती, युवक, युवतींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच १५ ते २० वर्षे मुले-मुली आणि २० वर्षांवरील ते २९ वर्षांखालील युवक व युवती अशा दोन गटात विज्ञान-तंत्रज्ञान, प्रगती, समाजसेवा उपाय, युवांपुढील आव्हाने, नैसर्गिक साधन संपत्ती जतन करण्याकरिता युवांची भूमिका, स्वच्छता अभियान आदी विषयांवर जिल्हास्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. १४ जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये लोकशाही बळकटीमध्ये...