Posts

संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर न केल्याने कर्मचाऱ्यांकडील अतिप्रदान रक्कम वसुलीबाबतच्या शासन निर्णयास स्थगिती

Image
 संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर न केल्याने कर्मचाऱ्यांकडील अतिप्रदान रक्कम वसुलीबाबतच्या शासन निर्णयास स्थगिती मुंबई, ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. 27 : राज्य शासकीय सेवेतील गट-अ, गट-ब आणि गट- क मधील ज्या कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विहित मुदतीत संगणक अर्हता प्रमाणपत्र सादर केलेले नाही, अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांची वेतनवाढ न रोखल्यामुळे त्यांना अतिप्रदान करण्यात आलेल्या रकमेच्या वसुलीबाबत दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. या शासन आदेशास स्थगिती देण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासन (माहिती तंत्रज्ञान) विभागाने आज दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे.

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट (दि. २७ नोव्हेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)   जिल्ह्यात आणखी १७ कोरोना बाधित   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील २, मंगरूळपीर शहरातील २, मालेगाव शहरातील ४, शिरपूर येथील १, राजाकिन्ही येथील २, इराळा कॅम्प येथील १, रिसोड शहरातील एकता नगर येथील १, सवड येथील १, कारंजा लाड शहरातील शिक्षक कॉलनी येथील २, मोहगव्हाण येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले असून २८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   कोरोना बाधितांची सद्यस्थिती   एकूण पॉझिटिव्ह  –  ६०६६ ऍक्टिव्ह  –  २०७ डिस्चार्ज  –  ५७११ मृत्यू  –  १४७   (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

प्रोजेक्ट मुंबई आणि पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाचा ‘पर्यावरण २.०’ उपक्रम जाहीर

Image
  प्रोजेक्ट मुंबई आणि पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाचा ‘पर्यावरण २.०’ उपक्रम जाहीर राज्यातील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे उपाय सुचविण्याची संधी विजेत्यांनी सुचविलेले उपाय महाराष्ट्र सरकार अंमलात आणणार मुंबई, दि. २५ :  पर्यावरण संवर्धनासाठी विना-नफा तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या प्रोजेक्ट मुंबई आणि महाराष्ट्र सरकारच्या  पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाचा ‘एन्व्हॉयर्नमेंट(पर्यावरण) २.०-जेन नेक्स्ट: लँड, वॉटर, एअर’ हा उपक्रम जाहीर झाला असून या उपक्रमात ‘आयडियाज फॉर अॅक्शन’ या निबंध स्पर्धेद्वारे शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे उपाय सुचवण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमातसहभागी होण्याचे आवाहन पर्यावरण व हवामानातील बदल मंत्रालयाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी केले आहे. प्रधान सचिव मनीषा म्हैसकर म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण व हवामानातील बदल खात्याने नागरिकांना हवामानातील बदल व पर्यावरणीय समस्या याविषयी जागरुक करण्यासाठी, तसेच पर्यावरणामध्ये सुधारणा करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यास प्रोत्साहन देण्यासाठ...

संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन

Image
  संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन वाशिम ,  दि. २६ :  संविधान दिनानिमित्त आज, २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे ,  जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  

संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

Image
  संविधान दिनानिमित्त मंत्रालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची प्रमुख उपस्थिती मुंबई, दि.२६ :  दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालय येथे राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. यावेळी अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे उपस्थित होते. मंत्रालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी देखील त्यांचेसोबत उद्देशिकेचे वाचन केले.

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट (दि. २६ नोव्हेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)   जिल्ह्यात आणखी २१ कोरोना बाधित   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील १, मालेगाव तालुक्यातील इराळा कॅम्प येथील १, मारसूळ येथील १, रिसोड शहरातील १, भोकरखेड येथील ६, मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील १, मंगरूळपीर शहरातील १, कवठळ येथील १, कारंजा लाड शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, गुरुकृपा हॉटेल परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत झालेल्या आणखी २ मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे.   कोरोना बाधितांची सद्यस्थिती   एकूण पॉझिटिव्ह  –  ६०४९ ऍक्टिव्ह  –  २१८ डिस्चार्ज  –  ५६८३ मृत्यू  –  १४७   (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदान, मतमोजणीनिमित्त जिल्ह्यात मद्यविक्री बंद

Image
  अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदान, मतमोजणीनिमित्त जिल्ह्यात मद्यविक्री बंद वाशिम ,   दि. २४ (जिमाका) :   भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होत आहे. ह्या निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ४८ तास अगोदरपासून म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२० रोजीचे सायंकाळी ५ वा. पासून ते १ डिसेंबर २०२० रोजीचे सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण वाशिम जिल्ह्यात मद्यविक्री बंद राहणार आहे. तसेच मतमोजणी दिवशी, ३ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाच्या नावे असलेली अनुज्ञप्ती मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ५४ व ५८ अन्वये तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.

धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार द्या – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

Image
धर्मादाय रूग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रूग्णांना उपचार द्या – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ मुंबई, दि. 25 : मुंबई शहर व राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये 10 टक्के गरीब  रूग्णांना मोफत उपचाराच्या नियमांचे पालन करून उपचार द्यावेत असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोरोना महामारीच्या काळात ग्रामीण भागातील रूग्ण शहरात उपचारासाठी आले नाहीत. मात्र, आता रूग्ण उपचारासाठी येण्याचा ओघ वाढू शकतो यासाठी धर्मादाय रूग्णालयांनी सहकार्य करून, गरीब  रूग्णांची सेवा करावी अशा सूचना विधी व न्याय विभाग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिल्या. राज्यातील धर्मादाय रूग्णालयांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे 10 टक्के गरीब  रूग्णांना मोफत उपचार देण्याच्या नियमांचे पालन करण्यासाठी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव व विधी परामर्शी आर.एन. लढ्ढा, धर्मादाय आयुक्त आर.एन.जोशी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे, विधी व न्याय विभ...

राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी ३१ डिसेंबर पूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे

  राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी ३१ डिसेंबर पूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे वाशिम ,   दि. २५ (जिमाका) :   दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांचे हयातीचे प्रमाणपत्र सादर केले जाते. कोविड-१९ चा प्रादुर्भाव विचारात घेता राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यास ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. जीवन पोर्टल किंवा पूर्वीप्रमाणे बँकेमार्फत कोषागारास हयातीचे प्रमाणपत्र सादर करता येईल. तसेच प्रत्यक्ष कोषागारात जावून हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचा किंवा पोस्टाद्वारे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. तरी राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी ३१ डिसेंबर २०२० पूर्वी कोषागारास आपले हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांनी कळविले आहे.

उद्याच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार

Image
उद्याच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई, दि. 25 : राज्य शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी उद्या दि. 26 नोव्हेंबर, 2020 रोजी देशव्यापी लाक्षणिक संप करण्याची नोटीस शासनास दिली आहे. त्या अनुषंगाने उद्या होणाऱ्या लाक्षणिक संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे शासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.  या संपात राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र ही संघटना सहभागी आहे. संपामध्ये राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचारी सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 6 च्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यास संप करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. केंद्र शासनाचे ‘काम नाही, वेतन नाही’ हे धोरण राज्य शासनही अनुसरत आहे. याबाबत शासनाने दि. 25 नोव्हेंबर, 2020 रोजी परिपत्रक ...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट (दि. २५ नोव्हेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)   जिल्ह्यात आणखी ४० कोरोना बाधित   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील प्रसाद नगर येथील १, सावरगाव बर्डे येथील १, वाळकी जहांगीर येथील ३, मंगरूळपीर शहरातील हुडको कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, मालेगाव शहरातील ३, काळमाथा येथील २, इराळा कॅम्प येथील ३, शिरपूर येथील १, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, महानंदा नगर येथील १, अण्णाभाऊ साठे चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, वनोजा येथील १, बाळखेड येथील १, मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील २, विळेगाव येथील १, वारोली येथील १, असोला खु. येथील १, कारंजा लाड शहरातील ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   कोरोना बाधितांची सद्यस्थिती   एकूण पॉझिटिव्ह  –  ६०२८ ऍक्टिव्ह  –  २०८ डिस्चार्ज  –  ५६७४ मृत्यू  –  १४५   (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार...

कोविड लस वितरणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार टास्क फोर्सची स्थापना

Image
  कोविड लस वितरणासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार टास्क फोर्सची स्थापना मुंबई, दि. २४ :  कोविड लस प्रभावीपणे निर्माण करून तिचे वितरण करणे, ती देण्याबाबतचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आणि त्या लसीची किंमत व प्रमाण ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे.  या टास्क फोर्समध्ये वित्त, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. शशांक जोशी त्याचप्रमाणे जे.जे. आणि केईएम रुग्णालयाच्या प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध विभागांचे प्रमुख सदस्य असतील.  या टास्क फोर्सने लस साठवण आणि वितरण व्यवस्थेसाठी शीत साखळी ठरविणे व लसीकरणाच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत आवश्यक बाबी तसेच किंमत ठरविणे अपेक्षित आहे.

सार्वजनिक‍ खाजगी भागीदारी तत्वामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

Image
    सार्वजनिक‍ खाजगी भागीदारी तत्वामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख मुंबई, दि. २४ :  सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला.  वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत सार्वजनिक‍ खाजगी भागीदारी तत्वाच्या (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) संभाव्य धोरणासंदर्भात मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह डॉ. गुस्ताद डावर, डॉ. अजय भांडारवार, डॉ. संजय बिजवे, श्री. पागे उपस्थित होते. तर ऑनलाईन मिटींगद्वारे टाटा हॉस्पीटलचे डॉ. राजन बडवे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. भावेश मोदी, डॉ.चंद्रशेखर उपस्थित होते.  श्री. देशमुख म्हणाले की, सध्या कोविड-19 या विषाणूमुळे जगातील, देशातील आणि महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. असे असले तरी यापुढील काळात सामान्य माणसाल...

शिक्षकांच्या कोरोना चाचणी मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Image
  शिक्षकांच्या कोरोना चाचणी मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी ·          सवड येथील कोविड टेस्ट सेंटरला भेट वाशिम ,   दि. २४ (जिमाका) :   जिल्ह्यातील नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबर पासून सुरु झाले, तत्पूर्वी नववी ते बारावी वर्गाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तसेच आता पाचवी ते आठवी वर्गाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची सुद्धा कोरोना चाचणी करण्याची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आहे. या अंतर्गत रिसोड तालुक्यातील सवड येथील कोरोना टेस्ट सेंटरमध्ये होत असलेल्या शिक्षकांच्या कोरोना चाचणीच्या कामकाजाची जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज भेट देवून पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षक तसेच शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अध्यापनासाठी व कार्यालयीन कामकाजासाठी शाळेमध्ये जावू नये, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले. यावेळी रिसोडचे तहसील...

हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

Image
  हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख मुंबई, दि. २४ :  कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे ही सुद्धा काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता महाराष्ट्रातील दुर्गम भागात वैद्यकीय शिक्षण संबंधित पायाभूत सुविधा, महाविद्यालये व रुग्णालये विकसित करण्यास महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले. या अनुषंगाने हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  हिंगोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील बैठक मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, खासदार राजीव सातव, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. श्री. देशमुख म्हण...

जिल्ह्यातील मतदान केंद्रांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

Image
  अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक जिल्ह्यातील मतदान केंद्रांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी वाशिम ,   दि. २४ (जिमाका) :   विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणुकीसाठी १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होणार आहे. याकरिता जिल्ह्यात एका सहाय्यकारी मतदान केंद्रासह ७ मतदान केंद्र असणार आहे. या मतदान केंद्रांवर उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी षण्मुगराजन एस. यांनी मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. सर्व मतदान केंद्रांवर किमान मुलभूत सुविधांची सद्यस्थिती, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर यासारख्या सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच  निवडणूक प्रक्रीये दरम्यान कोविड-१९ सुरक्षात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. मतदाना दिवशी सुद्धा विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. मतदारांची थर्मल स्क्रीनिंग व पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथक सुद्धा उपस्थित असणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रावर कर...

कोरोना_अलर्ट

Image
कोरोना_अलर्ट (दि. २४ नोव्हेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)   जिल्ह्यात आणखी २१ कोरोना बाधित   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील १, शिवाजी चौक परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचा १, शिरपुटी येथील १, मंगरूळपीर शहरातील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर परिसरातील १, इतर ठिकाणचे ९, सवड येथील १, लोणी येथील १, कारंजा लाड शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, तुषार कॉलनी येथील १, सुकळी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   कोरोना बाधितांची सद्यस्थिती   एकूण पॉझिटिव्ह  –  ५९८८ ऍक्टिव्ह  –  १७४ डिस्चार्ज  –  ५६६८ मृत्यू  –  १४५   (टीप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)  

मुंबईतील पाणीकपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
  मुंबईतील पाणीकपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनोरी येथे २०० एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणार मुंबई, दि. २३ : मुंबईत मे व जून महिन्यातील पाणीकपात टाळण्यासाठी मनोरी येथे समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीचा आढावा घेऊन प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी दिले.  वर्षा या शासकीय निवासस्थानी 200 एमएलडी नि:क्षारीकरण प्रकल्प उभारणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे,  मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची प्रमुख  उपस्थिती होती.  मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पावसाळ्याच्या सुरुवातीला सातत्याने पाऊस उशिरा येत असल्याने मे व जून महिन्यामध्ये मुंबईत 10 ते 15 टक्के पाणीकपात करावी...

दिव्यांग पदवीधर मतदारांसाठी हेल्पलाईन – रविंद्र ठाकरे

Image
    दिव्यांग पदवीधर मतदारांसाठी हेल्पलाईन – रविंद्र ठाकरे नागपूर ,   दि.   2 3  :     नागपूर विभाग पदवीधर मतदार संघातील दिव्यांग मतदारांना मतदार यादीतील आपले नाव तसेच मतदान केंद्र सुलभपणे उपलब्ध व्हावे, यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली असल्याची माहिती  जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. दिव्यांग पदवीधर मतदार मतदानापासून वंचित राहणार नाहीत. यासाठी विशेष समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहरातील तसेच जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना मतदानासंदर्भात मार्गदर्शन तसेच मतदार यादीतील नाव सुलभपणे उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत दूरध्वनी क्रमांक 0712-2541832 या हेल्पलाईनवर संपर्क साधता येईल. तसेच दिव्यांग मतदारांसाठी नियुक्त करण्यात आलेले नोडल ऑफिसर अभिजित राऊत हे 0712-2700900 व 726280 या दूरवध्वनीवर सुद्धा पदवीधर मतदार संघासाठीच्या मतदान प्रक्रियेबद्दल दिव्यांगांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी दिली. पदवीधर मतदार संघासाठी दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर भारत न...

विधान परिषद निवडणुकीसाठी दहा केंद्रांवर होणार मतदान

Image
विधान परिषद निवडणुकीसाठी दहा केंद्रांवर होणार मतदान   धुळे ,  दि . 23 ( जिमाका वृत्तसेवा ) :  महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदान होईल. या मतदानासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. या मतदान केंद्रांवर त्या- त्या तालुक्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनात मतदान केंद्र असणार आहे. त्यात तहसील कार्यालय, धुळे ग्रामीण, तहसील कार्यालय, साक्री, तहसील कार्यालय, शिंदखेडा, तहसील कार्यालय, शिरपूर (नवीन इमारत) जि. धुळे, तहसील कार्यालय, नंदुरबार, जि. नंदुरबार, तहसील कार्यालय, नवापूर, तहसील कार्यालय, शहादा, तहसील कार्यालय, अक्राणी, तहसील कार्यालय, तळोदा, तहसील कार्यालय, अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथे मतदानाची प्रक्रिया पार पडेल. ज्या तालुक्यातील संबंधित मतदार विजयी झाले असतील त्...