शिक्षकांच्या कोरोना चाचणी मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

 शिक्षकांच्या कोरोना चाचणी मोहिमेची

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी






·        सवड येथील कोविड टेस्ट सेंटरला भेट

वाशिम, दि. २४ (जिमाका) : जिल्ह्यातील नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग २३ नोव्हेंबर पासून सुरु झाले, तत्पूर्वी नववी ते बारावी वर्गाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तसेच आता पाचवी ते आठवी वर्गाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची सुद्धा कोरोना चाचणी करण्याची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आहे. या अंतर्गत रिसोड तालुक्यातील सवड येथील कोरोना टेस्ट सेंटरमध्ये होत असलेल्या शिक्षकांच्या कोरोना चाचणीच्या कामकाजाची जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज भेट देवून पाहणी केली.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षक तसेच शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अध्यापनासाठी व कार्यालयीन कामकाजासाठी शाळेमध्ये जावू नये, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले. यावेळी रिसोडचे तहसीलदार अजित शेलार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू