जिल्ह्यातील मतदान केंद्रांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक
जिल्ह्यातील मतदान केंद्रांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
वाशिम, दि. २४ (जिमाका) : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणुकीसाठी १ डिसेंबर २०२० रोजी मतदान होणार आहे. याकरिता जिल्ह्यात एका सहाय्यकारी मतदान केंद्रासह ७ मतदान केंद्र असणार आहे. या मतदान केंद्रांवर उपलब्ध सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी षण्मुगराजन एस. यांनी मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली.
सर्व मतदान केंद्रांवर किमान मुलभूत सुविधांची सद्यस्थिती, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर यासारख्या सुविधा मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच निवडणूक प्रक्रीये दरम्यान कोविड-१९ सुरक्षात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. मतदाना दिवशी सुद्धा विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. मतदारांची थर्मल स्क्रीनिंग व पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य पथक सुद्धा उपस्थित असणार आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी षण्मुगराजन एस. यांनी वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर व कारंजा लाड येथील मतदान केंद्रांची पाहणी केली. यावेळी संबंधित तालुक्याचे तहसीलदार उपस्थित होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME