विधान परिषद निवडणुकीसाठी दहा केंद्रांवर होणार मतदान

विधान परिषद निवडणुकीसाठी दहा केंद्रांवर होणार मतदान 




धुळेदि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदान होईल. या मतदानासाठी धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दहा मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. या मतदान केंद्रांवर त्या- त्या तालुक्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे, तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनात मतदान केंद्र असणार आहे. त्यात तहसील कार्यालय, धुळे ग्रामीण, तहसील कार्यालय, साक्री, तहसील कार्यालय, शिंदखेडा, तहसील कार्यालय, शिरपूर (नवीन इमारत) जि. धुळे, तहसील कार्यालय, नंदुरबार, जि. नंदुरबार, तहसील कार्यालय, नवापूर, तहसील कार्यालय, शहादा, तहसील कार्यालय, अक्राणी, तहसील कार्यालय, तळोदा, तहसील कार्यालय, अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथे मतदानाची प्रक्रिया पार पडेल. ज्या तालुक्यातील संबंधित मतदार विजयी झाले असतील त्या तालुक्यातील तहसील कार्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर संबंधित मतदारांनी मतदान करावयाचे आहे, याची संबंधित मतदारांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे.

 

 

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर वैद्यकीय पथक नियुक्त करावे - जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव

 

धुळेदि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एक डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मतदान होईल. धुळे जिल्ह्यात चार तहसील कार्यालयांमध्ये मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात येईल. तेथे आरोग्य विभागाने वैद्यकीय पथक नियुक्त करावे. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले,  कोरोनाचे नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सतर्क राहावे. मतदान केंद्रावर आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देतानाच वैद्यकीय पथक मतदानाच्या कालावधीसाठी नियुक्त करावे. उपजिल्हाधिकारी श्री. भामरे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या उपाययोजनेची माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू