राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी ३१ डिसेंबर पूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे

 राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी
३१ डिसेंबर पूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे




वाशिम, दि. २५ (जिमाका) : दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांचे हयातीचे प्रमाणपत्र सादर केले जाते. कोविड-१९ चा प्रादुर्भाव विचारात घेता राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांना हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्यास ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
जीवन पोर्टल किंवा पूर्वीप्रमाणे बँकेमार्फत कोषागारास हयातीचे प्रमाणपत्र सादर करता येईल. तसेच प्रत्यक्ष कोषागारात जावून हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचा किंवा पोस्टाद्वारे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. तरी राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांनी ३१ डिसेंबर २०२० पूर्वी कोषागारास आपले हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे, असे जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे यांनी कळविले आहे.


Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू