अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक मतदान, मतमोजणीनिमित्त जिल्ह्यात मद्यविक्री बंद

 अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक
मतदान, मतमोजणीनिमित्त जिल्ह्यात मद्यविक्री बंद
वाशिम, दि. २४ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होत आहे. ह्या निवडणुका खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मतदानाची वेळ संपण्यापूर्वी ४८ तास अगोदरपासून म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२० रोजीचे सायंकाळी ५ वा. पासून ते १ डिसेंबर २०२० रोजीचे सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपूर्ण वाशिम जिल्ह्यात मद्यविक्री बंद राहणार आहे. तसेच मतमोजणी दिवशी, ३ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मद्यविक्री बंद राहणार आहे.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाच्या नावे असलेली अनुज्ञप्ती मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ५४ व ५८ अन्वये तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.



Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू