पोहरादेवी, उमरी खुर्द परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू
पोहरादेवी, उमरी खुर्द परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू · गुरु पौर्णिमेनिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना वाशिम , दि. २२ ( युगनायक न्युज नेटवर्क ) : गुरु पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथे मोठ्या संख्येने भाविक एकत्र येवून कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होवू नये, यासाठी पोहरादेवी व उमरी खुर्द येथील मुख्य मंदिराचे सभामंडप व त्या लगतच्या ५ किलोमीटर परिसरात २२ जुलै २०२१ रोजीचे १५ वाजेपासून ते २३ जुलै २०२१ रोजीचे २४ वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत...