शासकीय वसतिगृहांसाठी भाड्याने इमारती
शासकीय वसतिगृहांसाठी भाड्याने इमारती
मुंबई, (युगनायक न्युज नेटवर्क)दि. 20 : महाराष्ट्र शासनाचे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मुलांकरिता 1 व मुलींकरिता 1 असे एकूण ०२ शासकीय वसतिगृहासाठी भाड्याने इमारती घेऊन सुरु करण्यात येणार आहे. तरी मुंबई शहर जिल्ह्यातील ज्या इमारत मालकांना भाडेतत्वावर इमारत द्यावयाची आहे. त्यानी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर प्रशासकीय इमारत, भाग-1, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई - 71. या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME