एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सेवा पुरवठादारांनी १० ऑगस्टपर्यंत नोंदणीसाठी करावी
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सेवा पुरवठादारांनी १० ऑगस्टपर्यंत नोंदणीसाठी करावी
वाशिम, दि. २२ (युगनायक न्युज नेटवर्क) : सन २०२१-२२ या वर्षासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत संरक्षित शेती या घटकांतर्गत हरीतगृह/शेडनेट/केबल अँड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या कंपन्या/ सेवा पुरवठादारांची नोंदणी प्रक्रीया राज्यस्तरावरुन राबविण्यात येत आहे. राज्यस्तरीय नोंदणी राबविण्याबाबतची कार्यपध्दती, अटी व शर्ती आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबतचा सविस्तर तपशील www.mahanhm.in व https://krishi.maharashtra.
तरी हरीतगृह, शेडनेटगृह, केबल अँड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या इच्छुक कंपनी, सेवापुरवठादार यांनी विहीत अटी व शर्तीच्या अनुषंगाने नोंदणी करीताचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, साखर संकूल, पुणे-५ या कार्यालयास १० ऑगस्ट २०२१ पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वाशिम यांनी केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME