महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व योजनांचे अर्ज ५ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन

 महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व योजनांचे अर्ज ५ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन



वाशिम, दि. २२ (युगनायक न्युज नेटवर्क) : अनुसूचित जातीविमुक्त जाती भटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/ शिक्षण फीपरिक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील अर्ज स्विकारण्यासाठी ३ डिसेंबर २०२० पासून नवीन प्रवेशित व नुतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी शासनाचे https://mahadbt.mahait.gov.in हे महाडीबीटी पोर्टल संकेतस्थळ कार्यान्वयीत करण्यात आले आहे.

        सन २०२०-२१ मधील अनुसूचित जातीविमुक्त जाती भटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे https://mahadbt.mahait.gov.in या महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत बाकी राहिलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घ्यावे. महाडीबीटी पोर्टलवरील अर्ज भरण्याची ही अंतिम संधी असेल. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जातीविमुक्त जाती भटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलला फार कमी प्रमाणात नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे. तरी जिल्हयातील सर्व प्राचार्यानी आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वरील योजनांचे दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी आपल्यास्तरावरुन आवाहन करावे.

        शैक्षणिक वर्ष सन २०१९-२० या वर्षातील महाविद्यालयस्तरावरील प्रलंबित राहिलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याचा सुध्दा कालावधी ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढवून देण्यात आला आहे. तरी सन २०१९-२० या वर्षातील प्रलंबित राहिलेल्या वरील प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीशिक्षण फीपरिक्षा फी (फ्रीशीप) व इतर योजनांच्या अर्जावर ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत कार्यवाही करावी.

        सर्व प्राचार्यांनी आपल्यास्तरावरुन सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास अवगत करुन तसेच महाडीबीटी पोर्टल https://dbtworkflow.mahaonline.gov.in या पडताळणी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या कालावधीनुसार संबंधित महाविद्यालयांनी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीशिक्षण फीपरिक्षा फी (फ्रीशीप) व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांच्या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज शासन निर्णयानुसार पडताळणी करुन पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईनव्दारे सहायक आयुक्तसमाज कल्याण यांच्याकडे पाठवावे. पात्र विद्यार्थी वरील योजनांपासून वंचित राहिल्यास आणि अशा विद्याथ्यांकडून फी वसूल केल्यास संबंधित महाविद्यालय शासन निर्णयानुसार कारवाईस पात्र राहिल, असे समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी कळविले आहे. 

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू