आत्मा गटांची, शेतकरी उत्पादक कंपनीची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
आत्मा गटांची, शेतकरी उत्पादक कंपनीची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
वाशिम, दि. २२ (युगनायक न्युज नेटवर्क) : प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, कृषी पायाभूत सुविधा, विकेल ते पिकेल व नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत आत्मा गटांची एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच विधाता सभागृहात संपन्न झाली. या एकदिवसीय कार्यशाळेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोट्टावर, कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे, विशाल पिंजरकर, जिल्हा संसाधन व्यक्ती, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना सन २०२०-२१ ते २०२१-२५ या वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील सोयाबीन, तेलवर्गीय पिके प्रक्रीया उद्योगांना गती देण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे. ही योजना असंघटीत क्षेत्रातील सोयाबीन प्रक्रीया उद्योगांसाठी राबविली जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोट्टावार यांनी दिली.
वैयक्तीक लाभार्थी, बचतगट, शेतकरी कंपनी याचा लाभ घेवू शकतात. सोयाबीन प्रक्रीया उद्योग नविन प्रकल्पासाठी तर Non ODOP जुन्या प्रकल्पासाठी अन्न प्रक्रीया उद्योगासाठी स्तरवृध्दी, विस्तारीकरण, आधुनिकीकरण, मार्केटींग ब्रांडीग यासाठी या योजनेचा लाभ घेता येतो. वैयक्तीक लाभार्थ्यांसाठी पॅनकार्ड, आधारकार्ड, पासींग सर्टिफिकेट, राहत्या घराचे वीजबील, बँक पासबुकाच्या मागील सहा महिन्याची छायाप्रत, उद्योग ज्या जागेत करणार त्याचे घरपत्रक उत्तारा, भाडे करारपत्र, मशीनरी कोटेशन, नविन बांधकाम करणार असल्यास सातबारा, बांधकाम नकाशा व अंदाजपत्रक हे कागदपत्र लागणार आहे.
बचतगटासाठी बचतगट स्थापनेच्या वेळचा ठराव, बँक पासबुक छायाप्रत, सर्व सदस्यांचे आधारकार्ड, असल्यास पॅनकार्ड, सर्व सदस्यांचे पासपोर्ट आकारातील फोटो, कोटेशन, जागेचा भाडे करार, उद्योग ज्या जागेत करणार त्याचे घरपत्रक उत्तारा, मशीनरी कोटेशन, कर्ज काढण्यासाठी त्या गटाचा ठराव, नविन बांधकाम करणार असल्यास सातबारा, बांधकाम नकाशा व अंदाजपत्रक ही कागदपत्रे दिल्यावर योजनेचा लाभ घेता येतो. वैयक्तीक लाभासाठी ऑनलाईन PMFME पोर्टलवर https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. शेतकरी कंपनी, बचतगटांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन अर्ज सादर करावे. मा. बाळासाहेब कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, कृषी पायाभूत सुविधा योजना, विकेल ते पिकेल आणि नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प इत्यादीचे सर्व शेतकरी, उत्पादक कंपनी/आत्मा गटांसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME