महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत कोरोना बाधितांवर मोफत उपचारासाठी १५ खाटा राखीव
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत कोरोना बाधितांवर मोफत उपचारासाठी १५ खाटा राखीव
वाशिम, दि. २० (युगनायक न्युज नेटवर्क) : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र कोविड-१९ बाधित रुग्णांवर मोफत उपचारासाठी वाशिम येथील देवळे हॉस्पिटलमधील १५ खाटा राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १९ जुलै रोजी जारी केले आहेत.
देवळे हॉस्पिटलमधील ७ बेडचा आयसीयु वार्ड आणि ८ बेडचा जनरल वार्ड असे एकूण १५ बेड कोविड-१९ बाधित रुग्णालयासाठी राखीव ठेवण्याची परवानगी देण्याबाबत डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व २१ मे २०२० रोजीच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अधिसूचनेनुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी देवळे हॉस्पिटलमधील १५ खाटा राखीव ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME