लसीचा दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेल्या व्यक्तींना ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास

 लसीचा दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेल्या व्यक्तींना ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास




वाशिम, दि. २० (युगनायक न्युज नेटवर्क) : कोविड-१९ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व दुसरा डोस घेवून १५ दिवसाचा कालावधी झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे. याकरिता त्यांच्याकडे कोव्हीन पोर्टलवरील लसीकरणाचे अंतिम प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १६ जुलै रोजी जारी केले आहेत.

लसीचा दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार असला तरी त्यांनी मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे व वारंवार हात धुणे आदी कोरोना-१९ नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. तसेच इतर सर्व व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचणीच्या ‘निगेटिव्ह’ अहवाल वैधतेचा कालावधीत ४८ तासांऐवजी ७२ तास करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू