९ रुग्णांच्या उपचारासाठी आकारलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे ‘सेक्युरा हॉस्पिटल’ला आदेश

 ९ रुग्णांच्या उपचारासाठी आकारलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे सेक्युरा हॉस्पिटलला आदेश



वाशिम, दि. २० (युगनायक न्युज नेटवर्क) : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी गतवर्षी सेक्युरा हॉस्पिटल येथे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. याठिकाणी उपचार घेतलेल्या आणखी ९ कोरोना बाधितांकडून उपचारासाठी अतिरिक्त शुल्क घेण्यात आल्याचे देयक तपासणीसाठी नियुक्त भरारी पथकाने आपल्या हवालामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदर अतिरिक्त शुल्काची रक्कम संबंधितांना सव्याज परत करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.

सेक्युरा हॉस्पिटलचे व्यवस्थापक यांनी सदर ९ कोविड बाधित रुग्णांकडून आकारलेली देयकातील नमूद तफावतीची २८ हजार ६५० रुपये रक्कम सदर रुग्णांना सुट्टी मिळाल्यापासून ते आजपावेतो पीएलआर दराने म्हणजेच १० मार्च २०२० पासून १० जून २०२० पर्यंत १२.९० टक्के दराने व १० जून २०२० पासून १२.१५ टक्के दराने सदर रक्कम रुग्णांच्या बँक खात्यात पुढील १५ दिवसांत जमा करावी. सदर कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असा आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १३ जुलै रोजी निर्गमित केला आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू