Posts

पोहरादेवी, उमरी खुर्द परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Image
  पोहरादेवी, उमरी खुर्द परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू ·         गुरु पौर्णिमेनिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना वाशिम ,   दि. २२ ( युगनायक न्युज नेटवर्क ) :  गुरु पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथे मोठ्या संख्येने भाविक एकत्र येवून कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होवू नये, यासाठी पोहरादेवी व उमरी खुर्द येथील मुख्य मंदिराचे सभामंडप व त्या लगतच्या ५ किलोमीटर परिसरात २२ जुलै २०२१ रोजीचे १५ वाजेपासून ते २३ जुलै २०२१ रोजीचे २४ वाजेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत...

वनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Image
वनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे   मुंबई   ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. 21 - आदिवासींचे हक्क डावलले जाऊ नयेत, त्याच बरोबर वनांचेही संरक्षण व्हावे, यासाठी स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. वन हक्क कायद्याअंतर्गत  नियमांनुसार वनपट्ट्यांतील गावांचा समावेश करून, या गावांचा रोजगार हमी योजनेत समावेश करावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. वनहक्क कायदा व सामूहिक वनहक्काचे संरक्षण व वनआधारित उपजीविका याबाबत अंमलबजावणी व शासनाची अपेक्षित भूमिका या संदर्भात आज दृरदृश्य प्रणालीद्वारे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या बैठकीस वन विभागाचे प्रधान सचिव श्री. वेणूगोपाल रेड्डी, रोजगार हमी योजनेचे प्रधान सचिव श्री. नंद कुमार , आदिवासी विकास विभागाचे सहसचिव श्री. ढोके, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री सुनिल लिमये,  प्रधान वन संरक्षक श्री. साईप्रकाश यांच्यासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी...

प्रत्येक गावात ‘मनरेगा’चे काम सुरु करावे - अपर मुख्य सचिव नंदकुमार

Image
  प्रत्येक गावात ‘मनरेगा’चे काम सुरु करावे -           अपर मुख्य सचिव नंदकुमार ·         जिल्ह्यातील रोहयो कामांचा आढावा वाशिम ,   दि. २२ ( युगनायक न्युज नेटवर्क ) :  जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपये करण्याचे उद्दिष्ट ठेवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करावी. प्रत्येक गावामध्ये ‘मनरेगा’चे काम सुरु करून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिले. जिल्ह्यातील रोहयो कामांचा आढावा घेण्यासाठी आज, २२ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे यांच्यासह सर्व गट विकास अधिकारी व रोहयोचे तालुकास्तरीय कर्मचारी उपस्थित होते. श्री. नंदकुमार म्हणाले,  ‘मनरेगा’च्या माध्यमातून  जिल्ह्यातील लोकांना सम...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सेवा पुरवठादारांनी १० ऑगस्टपर्यंत नोंदणीसाठी करावी

Image
  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान  सेवा पुरवठादारांनी १० ऑगस्टपर्यंत नोंदणीसाठी करावी वाशिम ,   दि. २२ ( युगनायक न्युज नेटवर्क ) :   सन २०२१-२२ या वर्षासाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत संरक्षित शेती या घटकांतर्गत हरीतगृह/शेडनेट/केबल अँड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या कंपन्या/ सेवा पुरवठादारांची नोंदणी प्रक्रीया राज्यस्तरावरुन राबविण्यात येत आहे. राज्यस्तरीय नोंदणी राबविण्याबाबतची कार्यपध्दती ,  अटी व शर्ती आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबतचा सविस्तर तपशील  www.mahanhm.in   व  https://krishi.maharashtra. gov.in   या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.         तरी हरीतगृह, शेडनेटगृह ,  केबल अँड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह उभारणी करणाऱ्या इच्छुक कंपनी, सेवापुरवठादार यांनी विहीत अटी व शर्तीच्या अनुषंगाने नोंदणी करीताचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह संचालक ,  महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ ,  साखर संकूल ,  पुणे-५ या कार्यालयास १० ऑगस्ट २०२१ पर्यंत सादर कराव...

माहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर

Image
माहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर   मुंबई ,  ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. २२ :   माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ हे नोव्हेंबर 2019 मध्ये इस्त्राईल दौऱ्यावर गेले होते. याबाबत माध्यमांमध्ये विपर्यस्त वृत्त प्रसिद्धीस येत आहेत. परंतु, हे शिष्टमंडळ इस्त्राईलचे भारतातील कौन्सुलेट जनरल, मुंबई यांच्या निमंत्रणानुसार महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन इस्त्राईल दौऱ्यावर गेले होते, असा खुलासा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात येत आहे. सदरील दौऱ्यामध्ये शासकीय जनसंपर्कातील नवे प्रवाह सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग साधनांचा वापर वेब मीडियाचा जनसंवादासाठी वापर डिजिटल मार्केटिंग साधनांचा वापर करून शासनाच्या विविध विभागांबरोबर समन्वय आपत्कालीन स्थितीत किंवा एखाद्या मोठ्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळी माध्यमांचा उपयोग शासनाचे संदेश जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सर्वसमावेशक माध्यम आराखडा स्मार्ट सिटीमध्ये शासकीय जनसंपर्काची भूमिका सायबर गुन्हे रोखण्यसाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत केलेली जनजागृती पर्यटन वृद्धीसाठी र...

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व योजनांचे अर्ज ५ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन

Image
  महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व योजनांचे अर्ज  ५ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आवाहन वाशिम ,   दि. २२ ( युगनायक न्युज नेटवर्क ) :   अनुसूचित जाती ,  विमुक्त जाती भटक्या जमाती ,  इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/ शिक्षण फी ,  परिक्षा फी योजना व इतर ऑनलाईन झालेल्या योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील अर्ज स्विकारण्यासाठी ३ डिसेंबर २०२० पासून नवीन प्रवेशित व नुतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी शासनाचे  https://mahadbt.mahait.gov.in   हे महाडीबीटी पोर्टल संकेतस्थळ कार्यान्वयीत करण्यात आले आहे.         सन २०२०-२१ मधील अनुसूचित जाती ,  विमुक्त जाती भटक्या जमाती ,  इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे  https://mahadbt.mahait.gov.in   या महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर ५ ऑगस्ट २०२१ पर्यंत बाकी राहिलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घ्यावे. महाडीबीटी पोर्टलवरील अर्ज भरण्य...

आत्मा गटांची, शेतकरी उत्पादक कंपनीची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

Image
  आत्मा गटांची, शेतकरी उत्पादक कंपनीची  एकदिवसीय कार्यशाळा संपन्न वाशिम ,   दि. २२ ( युगनायक न्युज नेटवर्क ) :   प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना ,  मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ,  कृषी पायाभूत सुविधा ,  विकेल ते पिकेल व नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पांतर्गत आत्मा गटांची एकदिवसीय कार्यशाळा नुकतीच विधाता सभागृहात संपन्न झाली. या एकदिवसीय कार्यशाळेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोट्टावर ,  कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे ,  विशाल पिंजरकर ,  जिल्हा संसाधन व्यक्ती ,  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.         प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उन्नयन योजना सन २०२०-२१ ते २०२१-२५ या वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील सोयाबीन ,  तेलवर्गीय पिके प्रक्रीया उद्योगांना गती देण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे. ही योजना असंघटीत क्षेत्रातील सोयाबीन प्रक्रीया उद्योगांसाठी राबविली जाणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोट्टावार यांनी दिल...

शासकीय वसतिगृहांसाठी भाड्याने इमारती

Image
  शासकीय वसतिगृहांसाठी भाड्याने इमारती मुंबई , ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. 20 : महाराष्ट्र शासनाचे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी  व विद्यार्थिनीसाठी मुंबई शहर जिल्ह्यामध्ये मुलांकरिता 1 व मुलींकरिता 1 असे एकूण ०२ शासकीय वसतिगृहासाठी भाड्याने इमारती घेऊन सुरु करण्यात येणार आहे. तरी मुंबई शहर जिल्ह्यातील ज्या इमारत मालकांना भाडेतत्वावर इमारत द्यावयाची आहे. त्यानी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर प्रशासकीय इमारत, भाग-1, चौथा मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई - 71. या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

लसीचा दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेल्या व्यक्तींना ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास

Image
  लसीचा दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेल्या व्यक्तींना  ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास वाशिम ,   दि. २० ( युगनायक न्युज नेटवर्क ) :   कोविड-१९ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व दुसरा डोस घेवून १५ दिवसाचा कालावधी झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे. याकरिता त्यांच्याकडे कोव्हीन पोर्टलवरील लसीकरणाचे अंतिम प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १६ जुलै रोजी जारी केले आहेत. लसीचा दुसरा डोस घेवून १५ दिवस झालेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणीशिवाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार असला तरी त्यांनी मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे व वारंवार हात धुणे आदी कोरोना-१९ नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. तसेच इतर सर्व व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचणीच्या ‘निगेटिव्ह’ अहवाल वैधतेचा कालावधीत ४८ तासांऐवजी ७२ तास करण्यात आला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती...

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत कोरोना बाधितांवर मोफत उपचारासाठी १५ खाटा राखीव

Image
  महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत  कोरोना बाधितांवर मोफत उपचारासाठी १५ खाटा राखीव वाशिम ,   दि. २० ( युगनायक न्युज नेटवर्क ) :   महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र कोविड-१९ बाधित रुग्णांवर मोफत उपचारासाठी वाशिम येथील देवळे हॉस्पिटलमधील १५ खाटा राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १९ जुलै रोजी जारी केले आहेत. देवळे हॉस्पिटलमधील ७ बेडचा आयसीयु वार्ड आणि ८ बेडचा जनरल वार्ड असे एकूण १५ बेड कोविड-१९ बाधित रुग्णालयासाठी राखीव ठेवण्याची परवानगी देण्याबाबत डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व २१ मे २०२० रोजीच्या सार्वजनिक आरोग्य विभाग अधिसूचनेनुसार महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी देवळे हॉस्पिटलमधील १५ खाटा राखीव ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे.

अर्थसंकेतच्या जीवन गौरव पुरस्कारांचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते वितरण

Image
  अर्थसंकेतच्या जीवन गौरव पुरस्कारांचे उद्योगमंत्र्यांच्या हस्ते वितरण मुंबई , ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. २०. उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या नवउद्योजकांचा आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते 'अर्थसंकेत - महाराष्ट्र गौरव २०२१' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ज्यांनी जोखीम घेऊन उद्योग उभा केला, रोजगार निर्माण केले, समाजाचे देणे फेडले, तसेच महाराष्ट्राचे नाव मोठे केले, अशा मराठी माणसांचा सन्मान करताना विशेष आनंद झाल्याचे श्री. देसाई म्हणाले. श्री. देसाई यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अर्थसंकेतच्या महाराष्ट्र गौरव २०२१ सोहळा पार पडला. संस्थेचे संस्थापक डॉ. अमित बागवे उपस्थित होते. यावेळी श्री. बागवे लिखित व्यवसाय वाढीसाठी व्हाटस्अप मार्केटिंग या पुस्तकाचे प्रकाशन श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.   यावेळी निकेतन तावरे व निर्मला तावरे -( निर्मलाज ब्राईटवेज एम बी ए क्लासेस), मनीषा कोळी - (सारंग हँडीक्राफ्ट), वैभव घोबाळे - (क्रांती उद्योजकता एकता केंद्र),  श्रीकांत लचके - (मेड इन स्वदेशी चेम्बर ऑफ कॉमर्स,  इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर), ॲ...

गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल

Image
  गर्भपात औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे दाखल मुंबई ,  ( युगनायक न्युज नेटवर्क )दि. 20 : गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा (Medical Termination of Pregnancy Kit) गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर दि. 26 जून 2021 ते 9 जुलै 2021 या कालावधीत तपासणी व धाडीची धडक मोहीम राबवून एकूण 348 ठिकाणी तपासणी केली. यात 14 गुन्ह्यांची नोंद झाली असून 11 व्यक्तींना अटक केली असल्याची माहिती औषध नियंत्रक प्राधिकारी व सहआयुक्त  दा. रा. गहाणे यांनी दिली. या तपासणीमध्ये काही किरकोळ विक्रेते गर्भपातासाठी लागणारी औषधे (MTP Kit) अवैधरित्या प्राप्त करुन घेत असल्याचे, तसेच काही विक्रेते चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून संबंधित किरकोळ विक्रेत्यांना अवैधरित्या प्राप्त केलेले व चढ्या दराने, विना प्रिस्क्रीप्शन, विना बिलाने गर्भपाताची औषधे विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकुण 47 हजार 378 किंम...

वाशिम जिल्ह्यात १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयचे आयोजन

Image
  वाशिम जिल्ह्यात १ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक न्यायालयचे आयोजन ·           सर्व तालुका न्यायालयांमध्ये  होणार सुनावणी ·           दाखलपुर्व ,  न्यायालयातील प्रलंबित  प्रकरणांचा समावेश ·           प्रत्यक्ष व ऑनलाईन स्वरुपात होणार  लोक न्यायालयाचे कामकाज वाशिम ,  दि. २० ( युगनायक न्युज नेटवर्क ) :  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या सूचनेनुसार सन २०२१ मधील पहिले राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन रविवार ,  १ ऑगस्ट २०२१ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. यामध्ये दाखलपुर्व व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. सदर लोक न्यायालय हे प्रत्यक्ष तसेच व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरुपात घेतले जाणार आहे. तरी संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवाव...

समृद्ध गाव स्पर्धेतील गावांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

Image
  समृद्ध गाव स्पर्धेतील गावांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान ·          पर्जन्यमापक यंत्राचे वितरण वाशिम ,  दि. १९ ( युगनायक न्युज नेटवर्क ) :  जिल्ह्यातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील ४३ गावांचा पानी फाऊंडेशनमार्फत आयोजित  ‘ समृद्ध गाव स्पर्धा ’ मध्ये समावेश आहे. या अंतर्गत मिनी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील २९ गावे पात्र ठरली आहेत. यापैकी दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी एका गावाचे सरपंच, वॉटर हिरो यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहातील कार्यक्रमात सन्मानपत्र, मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच त्यांना पर्जन्यमापक यंत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे ,  खासदार भावना गवळी ,  आमदार गोपीकिशन बाजोरिया ,  आमदार अॅड. किरणराव सरनाईक ,  आमदार राजेंद्र पाटणी ,  जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. ,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत ,  पोलीस अधीक्षक वसंत परदेशी ,  सहायक जिल्हाधिक...

मुंबईतील सर्व न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत; ई-लोक अदालतीचीही सुविधा

Image
  मुंबईतील सर्व न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत; ई-लोक अदालतीचीही सुविधा मुंबई , ( युगनायक न्युज नेटवर्क )दि.20 : न्यायालयातील प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच दिवाणी दावे आपसी सामंजस्याने मिटविण्यासाठी रविवारी दि.1 ऑगस्ट रोजी मुंबई येथील सर्व न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक पक्षकारांनी लवकर न्यायालयात विनंती अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, मुंबईचे सचिव हितेंद्र वाणी यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांचे निर्देशानुसार ही लोक अदालत होणार असून यात विशेष म्हणजे यावेळेस ई-लोक अदालतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे व त्याद्वारे दूरचित्रसंवाद प्रणालीच्या माध्यमातून प्रकरणे तडजोड करून मिटविण्याची मुभा देण्यात आली आहे. या लोकअदालतीत धनादेश अनादराची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद, विद्युत आणि पाणी देयकाबाबतची प्रकरणे, तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, आयकर कायद्यातील फौजदारी स्वरूपातील तडजोडपात्र प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई देण्याबाबतची प्रकरणे, वैवाहिक वाद संपादन प...

९ रुग्णांच्या उपचारासाठी आकारलेले अतिरिक्त शुल्क परत करण्याचे ‘सेक्युरा हॉस्पिटल’ला आदेश

Image
  ९ रुग्णांच्या उपचारासाठी आकारलेले  अतिरिक्त शुल्क परत करण्याचे   ‘ सेक्युरा हॉस्पिटल ’ ला आदेश वाशिम ,   दि. २० ( युगनायक न्युज नेटवर्क ) :   जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी गतवर्षी सेक्युरा हॉस्पिटल येथे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. याठिकाणी उपचार घेतलेल्या आणखी ९ कोरोना बाधितांकडून उपचारासाठी अतिरिक्त शुल्क घेण्यात आल्याचे देयक तपासणीसाठी नियुक्त भरारी पथकाने आपल्या हवालामध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदर अतिरिक्त शुल्काची रक्कम संबंधितांना सव्याज परत करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत. सेक्युरा हॉस्पिटलचे व्यवस्थापक यांनी सदर ९ कोविड बाधित रुग्णांकडून आकारलेली देयकातील नमूद तफावतीची २८ हजार ६५० रुपये रक्कम सदर रुग्णांना सुट्टी मिळाल्यापासून ते आजपावेतो   ‘ पीएलआर ’   दराने म्हणजेच १० मार्च २०२० पासून १० जून २०२० पर्यंत १२.९० टक्के दराने व १० जून २०२० पासून १२.१५ टक्के दराने सदर रक्कम रुग्णांच्या बँक खात्यात पुढील १५ दिवसा...