शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घेण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश
शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घेण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश पुणे, दि. २८ : शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात. पालक व शिक्षण संस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक रहावे व ऑनलाईन शिक्षणाचा फायदा घ्यावा. ज्यांना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांनी फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा द्यावी, असे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. राज्याच्या बोर्ड परीक्षेला जसे फॉर्म नंबर १७ चालतो तसा तो सीबीएसई, आईसीएससी शाळांबाबत चालेल का याबाबत शिक्षण विभागाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी शिक्षण विभागास केली. ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरू करण्यासंदर्भात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पालक आणि संस्थाचालक यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक सोडियम हायपो क्लोराईड खरेदी करावे व त्याचे मिश्र...