पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा
वाशिम, दि. २७ (युगनायक न्युज नेटवर्क) : पालकमंत्री शंभूराज देसाई हे २८ व २९ डिसेंबर रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
पालकमंत्री श्री. देसाई हे सोमवार, २८ डिसेंबर रोजी नागपूर येथून मोटारीने दुपारी ३ वाजता तळेगाव, कामरगाव, कारंजामार्गे वाशिमकडे प्रयाण करतील. रात्री ८.३० वाजता वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. मंगळवार, २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते सकाळी ११.३० वाजता दरम्यान पालकमंत्री श्री. देसाई हे जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतील. सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजतापर्यंत राखीव. दुपारी १.३० वाजता वाशिम येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME