ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक जातवैधता अर्ज सुट्टीच्या दिवशी स्विकारणार
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक जातवैधता अर्ज सुट्टीच्या दिवशी स्विकारणार
वाशिम, दि. 24 (जिमाका) : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. जिल्हयातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोचपावती जोडणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम या समितीच्या कार्यालयास मोठया प्रमाणात निवडणूकीत उभे राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज दाखल होत आहे. उमेदवारांची गैरसोय होवू नये म्हणून 25,26 आणि 27 डिसेंबर 2020 या सुट्टीच्या दिवशी सुध्दा समिती कार्यालय नियमित सुरु राहणार असल्याची माहिती संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम यांनी दिली.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME