प्रतिबंधात्मक आदेश 4 जानेवारीपर्यंत लागू
प्रतिबंधात्मक आदेश 4 जानेवारीपर्यंत लागू
वाशिम, दि. 24 (जिमाका) : जिल्हयात 25 डिसेंबर रोजी नाताळ हा सण ख्रिश्चन बांधवांतर्फे साजरा करण्यात येणार आहे. 31 डिसेंबर 2020 आणि 1 जानेवारी 2021 रोजी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी विविध प्रकारचे मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. 3 जानेवारी 2021 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतीक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
सद्यस्थितीत मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीस विरोध म्हणून जिल्हयात विविध प्रकारची आंदोलने करण्यात येत आहे. आगामी काळात मराठा क्रांती मोर्चा व मराठा आरक्षण समर्थक विविध संघटना व पक्षांकडून विविध प्रकारच्या आंदोलनात्मक कार्यक्रमाच्या आयोजनाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक, शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज मंजूरी, दूध दरवाढ, वाढती महागाई, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि इतर विविध मागण्या संदर्भात विरोधी पक्षाच्यावतीने तसेच शेतकरी संघटना आदींच्या वतीने मोर्चे, धरणे, आमरण उपोषणे, आत्मदहन, रास्ता रोको इत्यादी प्रकारच्या आंदोलनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
वाशिम जिल्हा हा जातीयदृष्टया आणि सण-उत्सवांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशिल आहे. जिल्हयात मागील काळात घडलेल्या जातीय घटनांच्या प्रतिक्रीया उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील बाबी लक्षात घेता जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये आणि शांतता व सुव्यवस्था कायम राहावी. यासाठी 21 डिसेंबर 2020 ते 4 जानेवारी 2021 या कालावधीत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षन्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME