मुंबई जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ८ जानेवारी पर्यंत अर्ज करावेत

मुंबई जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ८ जानेवारी पर्यंत अर्ज करावेत



मुंबई, दि. २४ : जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे आणि योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जिल्हा क्रीडा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. सन २०१९-२० च्या मुंबई शहर जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ८ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील पुरस्कारासाठी प्राप्त क्रीडा व खेळ प्रकारातील गुणवंत क्रीडापटू (एक पुरूष/ एक महिला व एक दिव्यांग खेळाडू),  गुणवंत मार्गदर्शक यांनी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा संकुल, २ रा मजला, सायन - वांद्रे लिंक रोड, धारावी बस डेपो शेजारी, धारावी, सायन (प), मुंबई येथून विनामुल्य प्राप्त करून घ्यावेत.

या पुरस्कारासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज ८ जानेवारी २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर (दूरध्वनी क्रमांक ९८१९७०२०७०, ९७५७०१४५३७ येथे संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

सुशिक्षित बेरोजगार संस्थांना होणार काम वाटप; १० ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

‘मुंबई’चा वारसा सांस्कृतिक एकजुटीचा – ज्येष्ठ पत्रकार तथा खासदार कुमार केतकर