Posts

जिल्हा परिषद, पंचायत समिती रिक्त जागांसाठी २३ मार्च रोजी महिला आरक्षण सोडत

Image
जिल्हा परिषद, पंचायत समिती रिक्त जागांसाठी २३ मार्च रोजी महिला आरक्षण सोडत वाशिम ,  दि. १७ (युगनायक न्युज नेटवर्क :  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या १४ व जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या २७ जागा रिक्त झाल्या असून सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. या जागांपैकी ५० टक्के जागांवर महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या रिक्त १४ पैकी ७ जागांवर महिला आरक्षण निश्चित केले जाईल. तसेच कारंजा, मंगरूळपीर, मानोरा पंचायत समितीच्या प्रत्येकी रिक्त ४ पैकी २, तसेच मालेगाव, रिसोड व वाशिम पंचायत समितीच्या प्रत्येकी रिक्त ५ पैकी ३ जागांवर महिला आरक्षण निश्चित केले जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद निवडणूक विभाग आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे २३ मार्च २०२१ रोजी सकाळी ११ वाजता, तसेच पंचायत समिती निर्वाचक गण आरक्षण सोडत संबंधित तहसील कार्यालय येथे...

SBI-RSETI च्या वतीने गरीब गरजू घटकांना कापड वाटप करण्यात आहे

Image
  SBI-RSETI च्या वतीने गरीब गरजू घटकांना  कापड वाटप करण्यात आहे वाशिम : (युगनायक न्युज नेटवर्क) स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था वाशिम च्या वतीने गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत कापड वाटप करण्यात आले भारतीय स्टेट बँक RSETI 2वाशिम येथील शिवणकाम प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिकणार्थ्यांनी शिवलेल्या कापड्याचे वाटप नुकतेच ग्राम भरजहाँगीर व सोनुना येथील गरीब कुटुंबातील लाभार्थींना करण्यात आले एस. बी. आय.आरसेटी. वाशिम च्या वतीने  विविध स्वयंरोजगाराचे मोफत प्रशिक्षण दिल्या जाते त्यामध्ये महिलांसाठी ब्युटी पार्लर शिवणकाम तसेच पुरुषासाठी टु-व्हिलर दुरुस्ती, मोबाईल रिपेरिंग, बकरी पालन, दुग्ध व्यवसाय, इत्यादी अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जातात प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिकणार्थीची राहण्याची व जेवणाची व्यवस्था RSETI च्या वतीने मोफत केली जाते.अश्या प्रकारचेआयोजित  महिलां शिवणकाम प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण कालावधीमध्ये शिवलेल्या कपड्याचे वाटप संस्थेचे संचालक  चंदन गवई सर यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण भागातील गरीब लाभार्थ्यांना करण्यात आले अश्या प्रकारचे सामाजिक ...

'होम क्वारंटाईन' करण्याचे अधिकार तहसीलदारांना प्रदान

Image
'होम क्वारंटाईन' करण्याचे अधिकार तहसीलदारांना प्रदान वाशिम, दि. १५ (युगनायक न्युज नेटवर्क) : कोरोना बाधित रुग्णांच्या आरोग्य स्थिती व घरात स्वतंत्र राहण्याची सुविधा असल्याची खात्री करून गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन) करण्यात येत. याबाबतचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे होते. मात्र, आता सदर अधिकारी संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, १५ मार्च रोजी जारी केले आहेत.

अमृत महोत्सव वर्षानिमित्त काळाकामठा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

Image
अमृत महोत्सव वर्षानिमित्त  काळाकामठा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर वाशिम ,  दि. १२ (युगनायक न्युज नेटवर्क)  :   अमृत महोत्सव वर्षानिमित्त वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिवासी बांधवांकरिता कायदे व योजना’ याविषयीचे मार्गदर्शन शिबीर १२ मार्च रोजी काळाकामठा (ता. मालेगाव) येथील स्व. सुशीलाबाई देशमुख प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी आदिवासी बांधवांसाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणद्वारा राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ लिपिक एस. एन. जगताप यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारा राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. माजी जिल्हा परिषद सदस्य आत्माराम धंदरे यांनी आदिवासी बांधवांसाठी योजना राबविण्यात येत असताना उपस्थित होणाऱ्या समस्याबाबत मार्गदर्शन केले. तर मुख्याध्यापक श्री. कळसकर यांनी आदिवासी बांधवांसाठी घटनात्मक तरतुदी व योजना या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांना राष्ट...

नवीन राज्य सांस्कृतिक धोरणासाठी शासनस्तरावर समिती गठीत करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

Image
नवीन राज्य सांस्कृतिक धोरणासाठी शासनस्तरावर समिती गठीत करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश   मुंबई, दि. १५ :   राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०१० मध्ये राज्याचे सांस्कृतिक धोरण आणण्यात आले होते. आता जवळपास ११ वर्षानंतर सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सुधारित सांस्कृतिक धोरण आणण्याची गरज असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. नवीन धोरणासाठी शासनस्तरावर एक समिती गठीत करून कालबद्ध कार्यक्रमांतर्गत त्याच्या शिफारशी सादर करण्याचे निर्देश श्री. देशमुख यांनी दिले. नवीन सांस्कृतिक धोरण संदर्भातील आढावा बैठक सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे आदी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र राज्य स्थापनेचे हे हीरक महोत्सवी वर्ष असून याच निमित्ताने सर्वसमावेशक असे सांस्कृतिक धोरण अंमलात आणण्यात येईल. सांस्कृतिक कार्य  विभागामार्फत सांस्...

मुंबई जीपीओचा इतिहास ई-पुस्तक रूपात; राज्यपालांच्या हस्ते डिजिटल प्रकाशन

Image
मुंबई जीपीओचा इतिहास ई-पुस्तक रूपात; राज्यपालांच्या हस्ते डिiजिटल प्रकाशन मुंबई, दि. १५ : १०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई जनरल पोस्ट ऑफिसच्या इतिहासावर आधारित पहिल्या (डॉन अंडर द डोम या) ई-पुस्तकाचे डिजिटल प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. गोल गुंबझच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या मुंबईतील ऐतिहासिक जीपीओ इमारतीचा इतिहास डिजिटल पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. मुंबई जीपीओ चा इतिहास ई-पुस्तक रुपात उपलब्ध करुन दिल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करुन राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले की, जीपीओला गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. देशातील प्रत्येक भागात पोस्ट ऑफीस सर्वसामान्यांपर्यंत पोहचलेले आहे. या पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून अनेकांना चांगले अनुभव आले आहेत. अशा अनुभवांचा, लोकांच्या प्रतिक्रियांचा आणि कथांचा संग्रह करुन प्रभावी पुस्तिकेची निर्मिती केल्यास पोस्ट विभागाचा ऐतिहासिक ठेवा या संग्रहाच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी उपलब्ध करता येईल, यासाठी पोस्ट ऑफीसने प्रयत्न करावेत. मुंबईला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक वास्तू आहेत. हा राष्ट...

महाराष्ट्र ‘हीरक’ महोत्सव : महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा’

 महाराष्ट्र ‘हीरक’ महोत्सव : महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा’ नवी दिल्ली, दि.९ : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे हे हीरक  महोत्सवी वर्ष आहे. गेल्या ६० वर्षात  महाराष्ट्राने विविध क्षेत्रांमध्ये केलेली  प्रगती उल्लेखनीय आहे, याचेच औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने ‘महाराष्ट्र गौरव गीत स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र   शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिनस्त दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्र आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या श्रृखंलेमध्ये महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत परिचय केंद्राने ‘महाराष्ट्र गौरव गीत लेखन स्पर्धा’ आयोजनाचा अभिनव  उपक्रम आखला आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रासह देश-विदेशात वास्तव्यास असणाऱ्या  व मराठी भाषा अवगत असणाऱ्या  व्यक्तींनी या उपक्रमात मोठया संख्येने सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन परिचय केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.   ‘ हीरक ’ महोत्सव महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्याच...

क्रिसील फाउंडेशनचा उपक्रम - कोरोना बाबत फोनकॉलद्वारे जनतेची जनजागृती.

Image
  मनिवाइज सेंटर च्या वतीने जनजागृती क्रिसील फाउंडेशनचा उपक्रम - कोरोना बाबत फोनकॉलद्वारे जनतेची जनजागृती. रिसोड - भारतीय रिझर्व बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया,नाबार्डच्या च्या माध्यमातून क्रिसील फाउंडेशन च्या सहकार्याने मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र अंतर्गत रिसोड तालुक्यातील गावांमध्ये आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण मागील तीन वर्षांपासून देण्यात येत आहे,परंतु कोविड 19 (कोरोना)या जागतिक संकटामुळे क्षेत्र कार्यावरील प्रशिक्षण थांबविण्यात आले आहे ,सदर वेळी वर्क फॉर्म ऑफिस दरम्यान एका दिवशी तालुक्यातील शेकडो लोकांना फोन कॉल द्वारे कोविड 19 विषाणूच्या  या आजारा संदर्भात दक्षता घेण्याचा संदेश पोहचविण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.यामध्ये खोकताना व शिंकताना रुमाल चा वापर करणे ,आवश्यकता असेल तेंव्हा च घराबाहेर पडणे ,बाहेर जाताना मास्क चा वापर करणे ,वेळोवेळी  साबणाने किंव्हा सॅनिटायझर नी स्वच्छ हात धुणे ,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे,अफवांवर विश्वास ठेवू नये वेळोवेळी प्रशासनास सहकार्य करावे आदी जनजागृती चे संदेश मनिवाइज प्रतिनिधी प्रफुल गवई ,किशोर चक्रनारायण, संघपाल वाघम...

जिल्ह्यात ‘रोहयो’ची जास्तीत जास्त कामे सुरु करा - अपर मुख्य सचिव नंद कुमार

  जिल्ह्यात ‘रोहयो’ची जास्तीत जास्त कामे सुरु करा -           अपर मुख्य सचिव नंद कुमार वाशिम ,  दि. १० (युगनायक न्यूज नेटवर्क) :   महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात जास्तीत जास्त कामे सुरु करण्याच्या सूचना रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी दिल्या. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज, १० मार्च रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्त शांतून गोयल, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे यांच्यासह सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या सभेत सहभागी झाले होते. अपर मुख्य सचिव नंद कुमार म्हणाले, सर्व ग्रामपंचायतींना व संबंधित यंत्रणांना यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरु करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. रोहयोची अपूर्ण कामे असतील, तेथे सदर कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नंदा खरे, आबा महाजन यांचे अभिनंदन

Image
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नंदा खरे, आबा महाजन यांचे अभिनंदन   मुंबई, दि. १२ : साहित्य अकादमीचे मानाचे पुरस्कार पटकावल्याबद्दल लेखिका नंदा खरे आणि बालसाहित्यिक बाबा महाजन यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री अभिनंदन संदेशात म्हणतात, नंदा खरे हे त्यांच्या साहित्यातून नेहमीच एक वेगळा विचार देतात आणि वाचकांना आत्मपरिक्षणही करायला लावतात. पुरस्कारप्राप्त "उद्या" या कादंबरीत भविष्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे त्यांनी केलेले टीकात्मक विश्लेषण वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय राहात नाही. मुलांची भाषा जाणणारे आबा महाजन यांनी देखील कथा, कविता या माध्यमातून मुलांचे भावविश्व अचूक रेखाटले. मी या दोन्ही साहित्यिकांचे मनापासून अभिनंदन करतो. मराठी साहित्य क्षेत्रातील नवे लेखक निश्चितच यातून  स्फूर्ती घेतील असा मला विश्वास वाटतो.

जिल्ह्यात ‘रोहयो’ची जास्तीत जास्त कामे सुरु करा - अपर मुख्य सचिव नंद कुमार

जिल्ह्यात ‘रोहयो’ची जास्तीत जास्त कामे सुरु करा -           अपर मुख्य सचिव नंद कुमार वाशिम ,  दि. १० (युगनायक न्यूज नेटवर्क) :   महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात जास्तीत जास्त कामे सुरु करण्याच्या सूचना रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी दिल्या. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज, १० मार्च रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्त शांतून गोयल, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे यांच्यासह सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या सभेत सहभागी झाले होते. अपर मुख्य सचिव नंद कुमार म्हणाले, सर्व ग्रामपंचायतींना व संबंधित यंत्रणांना यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरु करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. रोहयोची अपूर्ण कामे असतील, तेथे सदर कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवा...

महिला बचतगटांची कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवू नका - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस

Image
महिला बचतगटांची कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवू नका -           जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. वाशिम ,   दि. ०९ (युगनायक न्युज नेटवर्क) :    महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय नागरी उपजीविकाअभियान व महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बँकांकडे सादर होणारी महिला बचतगटांची कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवू नका. या प्रकरणांमध्ये काही त्रुटी असल्यास बँकांनी संबंधितांना याबाबत लेखी कळवावे. तसेच शासनाच्या इतर योजनांमधील कर्ज प्रकरणे सुद्धा लवकरात लवकर निकाली काढावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, ९ मार्च रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक बी. के. सिंग, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक विजय खंडरे, अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. डिसे...

यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी ११ मार्चपर्यंत मुदत

Image
यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अर्ज करण्यासाठी ११ मार्चपर्यंत मुदत मुंबई, दि. 9 : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या वतीने (एसआयएसी) संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या पूर्व प्रशिक्षणकरिता  पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणास प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून प्रवेश परीक्षेचा अर्ज ऑनलाइन भरण्यास दि. 11 मार्च, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे. 'एसआयएसी'च्या मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, व कोल्हापूर केंद्रातून हे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. दिनांक ७ मार्च, २०२१ ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 11 मार्च, 2021 राजी सायं. ५.०० वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी सूचना आदी माहिती  http://www.siac.org.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे हस्ते‘सन्मार्ग’ पॉम्प्लेट्चे विमोचन

Image
  जि ल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे हस्ते ‘सन्मार्ग’ पॉम्प्लेट्चे विमोचन वाशिम ,   दि. ०६ (युगनायक न्युज नेटवर्क) :    जिल्ह्यातील मागासवर्गीय घटकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांना व्हावी ,  आणि त्या माध्यमातून त्यांनी विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, या उद्देशाने अनुसूचित जाती उपयोजना सन २०२०-२१ अंतर्गत  जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमने तयार केलेल्या ‘सन्मार्ग’ या पॉम्प्लेट्चे विमोचन ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त  माया केदार ,  जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे ,  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज ,  महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे ,  जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माहिती सहाय्यक तानाजी घोलप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ‘सन्मार्ग’ या पॉम्प्लेटमध्ये आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य ,  कर्मवी...

आर्थिक साक्षरता काळाची गरज - सत्यपाल चक्रे

Image
आर्थिक साक्षरता काळाची गरज - सत्यपाल चक्रे जागतिक महिला दिनी वेबिनार च्या माध्यमातून मार्गदर्शन  रिसोड - भारतीय रिझर्व बँक ,स्टेट बँक ऑफ इंडिया ,व नाबार्ड च्या माध्यमातून क्रिसिल फाउंडेशन च्या साहाय्याने मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र अंतर्गत 8 मार्च ला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन वेबिनार घेण्यात आला .                  यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनिवाइज वाशिम चे जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे,विदर्भ कोकण ग्रामीण बँक रिसोड शाखेचे शाखा व्यवस्थापक तलेगावकर सर लाभले होते.यावेळी सदर वेबिनार चे प्रस्तावित केंद्र व्यवस्थापक प्रफुल गवई व संघपाल वाघमारे यांनी केले .यावेळी प्रमुख मार्गदर्शक यांनी आर्थिक साक्षरतेमध्ये महिलांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले ,या मध्ये सत्यपाल चक्रे यांनी महिलानी अधिकाधिक सहभाग घेऊन आपले कुटुंब आर्थिक साक्षर केले पाहिजे, घरगुती अर्थसंकल्प बनविण्याचे चे महत्व ,बँकांच्या मूलभत सेवा,चांगले आणि वाईट कर्ज ,सिबील रेकोर्ड व बेटी बचाव व बेटी पढाव असे विविध सामाजिक उपक्रम गावपातळीवर राबविल्या गेले पाहिजेत या स...

दुर्गम भागातील महिलांमधील रक्तक्षयाची समस्या कमी करण्याचा संगीता शिंदे यांचा निश्चय

Image
दुर्गम भागातील महिलांमधील रक्तक्षयाची समस्या कमी करण्याचा संगीता शिंदे यांचा निश्चय   महिला दिन विशेष पतीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले. आई-वडिलांचे मायेचे छत्रही  नाही...मोठ्या भावाचा मिळालेला आधार तिला लाखमोलाचा....आपल्या दोन मुलींकडे पाहून तिने स्वत:ला सावरले...दुर्गम भागातील रक्तक्षयाची समस्या दूर करण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ती प्रत्येक डोंगराळ भागातील पाड्यांवर जाते.....धडगाव तालुक्यातील निगदी उपकेंद्रातील आरोग्यसेविका संगीता शिंदे यांनी गेली आठ वर्षे आरोग्यसेवेचा हा प्रवास सुरू ठेवला आहे. संगीता यांचे पती गिरीष हुरेज यांचे आजारामुळे दुर्दैवी निधन झाल्यावर त्यांच्यासमोर भविष्याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह उभे होते. मात्र मुलींसाठी आणि आपल्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी जबाबदारीपासून दूर होणे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी तशाही परिस्थितीत  आपले काम पुढे नेले. रुग्णांच्या वेदना कमी केल्यावर मिळणाऱ्या समाधानात आपले दु:ख विसरण्याचा प्रयत्न केला. निगदी उपकेंद्रांतर्गत वावी आणि बोदला गावेही येतात. तिन्ही गावे मिळून 17 पाडे आहेत. यातील काही पाड्यांवर जाण्यासा...

कारंजा तालुक्यात कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया

Image
कारंजा तालुक्यात कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया ·         एका दिवसांत ५० हजार रुपये दंड वसूल ·         सुरक्षा नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानावरही कारवाई वाशिम ,   दि. ०६ :    कारंजा तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी काल, ५ मार्च रोजी कारंजा उपविभागीय कार्यालयात सर्व शासकीय यंत्रणांकडून आढावा घेतला. तसेच कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर, दुकानांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कारंजा शहर व तालुक्यात कोरोना सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस विभाग, नगरपरिषद व ग्रामपंचायातींकडून दंडात्मक कारवाया सुरु करण्यात आल्या आहेत. आज, ६ मार्च रोजी तालुक्यात दंडात्मक कारवायांमधून एकूण ५० हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांमार्फत नियोजनबद्ध प्रयत्न सुर...

विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून कोकण सुजलाम सुफलाम करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
विकेल ते पिकेल योजनेच्या माध्यमातून कोकण सुजलाम सुफलाम करुया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणातील युवकांनी शेतीची कास धरण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन   मुंबई   दि .- 6   :    शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासियांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मालवण तालुक्यातील मसुरे- आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजना ,मालोंड- मालडी कोल्हापुरी पाटबंधारे योजना आणि कणकवली तालुक्यातील कुंभवडे लघु पाटबंधारे योजनेचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष समिधा नाईक, खासदार सर्वश्री विनायक राऊत, अरविंद सावंत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरक...

महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी कार्यान्वित होणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी कार्यान्वित होणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर मुंबई, दि.६: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची ६ विभागस्तरीय कार्यालये येत्या जागतिक महिला दिनी ( दि. ८ मार्च)  कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. ही कार्यालये महिला व बालविकास विभागीय उपायुक्त कार्यालयात सुरू होत आहेत. अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू व्हावीत अशी संकल्पना मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मांडली होती. त्यानुसार नुकताच शासन निर्णय जारी करण्यात आला होता. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागस्तरावर ही कार्यालये महिला दिनी एकाच दिवशी प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत. मुंबई हे राज्याचे मध्यवर्ती ठिकाण नसल्यामुळे अत्याचारपीडित महिलांना महिला आयोगाकडे दाद मागायची असेल तर सुलभ संपर्क साधणे कठीण जात होते. तथापि, आता विभागीय कार्यालये सुरू होत असल्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. विभा...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना_अलर्ट

Image
वाशिम जिल्ह्यातील आजचा  कोरोना _ अलर्ट (दि. ६ मार्च २०२१ ,  सायं. ५.०० वा.)   वाशिम जिल्ह्यात आणखी २४५ कोरोना बाधित   वाशिम शहरातील बीएसएनएल ऑफिस जवळील १, सिद्धार्थ नगर येथील २, बसस्थानक परिसरातील १, लॉयन्स विद्यानिकेतन मागील १, नवीन आययुडीपी येथील २, सिंधी कॅम्प येथील १, हिंगोली नाका येथील २, अल्लाडा प्लॉट येथील ३, छत्रपती शिवाजी नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील ३, स्त्री रुग्णालय परिसरातील १, राजनी चौक येथील १, जानकी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, दगड उमरा येथील १२, वाळकी बाजारे येथील १, ब्रह्मा येथील १, कळंबा महाली येथील १, सुरकंडी खुर्द येथील ३, सुरकंडी बु. येथील १, मालेगाव शहरातील ५, शिरपूर येथील ४, जऊळका येथील १, पांगरी कुटे येथील १, मानोरा शहरातील राठी नगर येथील १, राजीव नगर येथील १, गादेगाव येथील १, गव्हा येथील १, कारखेडा येथील २, धामणी येथील १, नयणी येथील २, गिर्डा येथील १, पोहरादेवी येथील २, उमरी खु. येथील २, रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील २, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, अग्रसेन नगर येथील २, समर्थ नगर येथी...