अमृत महोत्सव वर्षानिमित्त काळाकामठा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर
अमृत महोत्सव वर्षानिमित्त काळाकामठा येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर
वाशिम, दि. १२ (युगनायक न्युज नेटवर्क)
: अमृत महोत्सव वर्षानिमित्त वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आदिवासी बांधवांकरिता कायदे व योजना’ याविषयीचे मार्गदर्शन शिबीर १२ मार्च रोजी काळाकामठा (ता. मालेगाव) येथील स्व. सुशीलाबाई देशमुख प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी आदिवासी बांधवांसाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणद्वारा राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. त्यानंतर वरिष्ठ लिपिक एस. एन. जगताप यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणद्वारा राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.
माजी जिल्हा परिषद सदस्य आत्माराम धंदरे यांनी आदिवासी बांधवांसाठी योजना राबविण्यात येत असताना उपस्थित होणाऱ्या समस्याबाबत मार्गदर्शन केले. तर मुख्याध्यापक श्री. कळसकर यांनी आदिवासी बांधवांसाठी घटनात्मक तरतुदी व योजना या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनाची माहिती असलेले परिपत्रके व कोविड-१९ च्या अनुषंगाने मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक अंतर व इतर कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME