आर्थिक साक्षरता काळाची गरज - सत्यपाल चक्रे

आर्थिक साक्षरता काळाची गरज - सत्यपाल चक्रे


जागतिक महिला दिनी वेबिनार च्या माध्यमातून मार्गदर्शन 


रिसोड - भारतीय रिझर्व बँक ,स्टेट बँक ऑफ इंडिया ,व नाबार्ड च्या माध्यमातून क्रिसिल फाउंडेशन च्या साहाय्याने मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र अंतर्गत 8 मार्च ला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन वेबिनार घेण्यात आला .

                 यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनिवाइज वाशिम चे जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे,विदर्भ कोकण ग्रामीण बँक रिसोड शाखेचे शाखा व्यवस्थापक तलेगावकर सर लाभले होते.यावेळी सदर वेबिनार चे प्रस्तावित केंद्र व्यवस्थापक प्रफुल गवई व संघपाल वाघमारे यांनी केले .यावेळी प्रमुख मार्गदर्शक यांनी आर्थिक साक्षरतेमध्ये महिलांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले ,या मध्ये सत्यपाल चक्रे यांनी महिलानी अधिकाधिक सहभाग घेऊन आपले कुटुंब आर्थिक साक्षर केले पाहिजे, घरगुती अर्थसंकल्प बनविण्याचे चे महत्व ,बँकांच्या मूलभत सेवा,चांगले आणि वाईट कर्ज ,सिबील रेकोर्ड व बेटी बचाव व बेटी पढाव असे विविध सामाजिक उपक्रम गावपातळीवर राबविल्या गेले पाहिजेत या सोबतच महिला दिन हा प्रत्येक दिवशी साजरा झाला पाहिजे यासह कोविड च्या काळात घ्यावयाची सुरक्षा या बद्दल मार्गदर्शन केले ,तसेच तलेगावकर सर यांनी बँक शी जुळून आपण आपला आर्थिक विकास साधावा असे सांगितले ,सदर वेबिनार ला ग्रामशक्ती सखी ,ग्रामीण वित्तीय सल्लागार ,मनिवाइज तालुका व ग्राम समिती सदस्य ,मनिवाइज मित्र यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. यावेळी महिला दिनाचे औचित्य साधून गावात चांगल्या प्रकारे ग्रामशक्ती सखी म्हणून कार्य करित असलेल्या सुनीता ताई गंगावणे, किरण बदर ,वर्षा इप्पर यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले.

                    सदर वेबिनार चे आयोजन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्था पक दत्तात्रय निनावकर  ,नाबार्ड चे साहाय्यक व्यवस्थापक विजय खंडरे ,क्रिसील फाउंडेशन चे राज्य समन्वय क शक्ती भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले .यावेळी उपस्थितांचे आभार किशोर चक्रनारायण यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू