जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे हस्ते‘सन्मार्ग’ पॉम्प्लेट्चे विमोचन

 जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांचे हस्ते‘सन्मार्ग’ पॉम्प्लेट्चे विमोचन


वाशिम, दि. ०६ (युगनायक न्युज नेटवर्क) :  जिल्ह्यातील मागासवर्गीय घटकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांना व्हावीआणि त्या माध्यमातून त्यांनी विविध योजनांचा लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे, या उद्देशाने अनुसूचित जाती उपयोजना सन २०२०-२१ अंतर्गत  जिल्हा माहिती कार्यालय, वाशिमने तयार केलेल्या ‘सन्मार्ग’ या पॉम्प्लेट्चे विमोचन ८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त  माया केदार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरेजिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाजमहिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरेजिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माहिती सहाय्यक तानाजी घोलप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
‘सन्मार्ग’ या पॉम्प्लेटमध्ये आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्यकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनाअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणेकन्यादान योजनाअनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाअनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीअनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींसाठी निवासी शाळाडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनाभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाराजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारमुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे व दुभत्या जनावरांचे गट वाटप आदी योजनांची माहिती देण्यात आली आहे. लाभाचे स्वरूपअटी व शर्ती ,आवश्यक कागदपत्रे तसेच कोणत्या अधिकाऱ्यांशी योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा, हे नमूद करण्यात आले आहे. पॉम्प्लेट्मधील योजनांच्या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू