क्रिसील फाउंडेशनचा उपक्रम - कोरोना बाबत फोनकॉलद्वारे जनतेची जनजागृती.

 मनिवाइज सेंटर च्या वतीने जनजागृती


क्रिसील फाउंडेशनचा उपक्रम - कोरोना बाबत फोनकॉलद्वारे जनतेची जनजागृती.


रिसोड - भारतीय रिझर्व बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया,नाबार्डच्या च्या माध्यमातून क्रिसील फाउंडेशन च्या सहकार्याने मनिवाइज वित्तीय साक्षरता केंद्र अंतर्गत रिसोड तालुक्यातील गावांमध्ये आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण मागील तीन वर्षांपासून देण्यात येत आहे,परंतु कोविड 19 (कोरोना)या जागतिक संकटामुळे क्षेत्र कार्यावरील प्रशिक्षण थांबविण्यात आले आहे ,सदर वेळी वर्क फॉर्म ऑफिस दरम्यान एका दिवशी तालुक्यातील शेकडो लोकांना फोन कॉल द्वारे कोविड 19 विषाणूच्या  या आजारा संदर्भात दक्षता घेण्याचा संदेश पोहचविण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.यामध्ये खोकताना व शिंकताना रुमाल चा वापर करणे ,आवश्यकता असेल तेंव्हा च घराबाहेर पडणे ,बाहेर जाताना मास्क चा वापर करणे ,वेळोवेळी  साबणाने किंव्हा सॅनिटायझर नी स्वच्छ हात धुणे ,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे,अफवांवर विश्वास ठेवू नये वेळोवेळी प्रशासनास सहकार्य करावे आदी जनजागृती चे संदेश मनिवाइज प्रतिनिधी प्रफुल गवई ,किशोर चक्रनारायण, संघपाल वाघमारे करीत आहेत.

            सदर उपक्रम जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर,नाबार्ड चे सहाययक महाव्यवस्थापक विजय खंडरे, क्रिसील फाउंडेशन चे राज्य समन्वयक शक्ती भिसे ,मनिवाइज चे जिल्हा समन्वयक सत्यपाल चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू