SBI-RSETI च्या वतीने गरीब गरजू घटकांना कापड वाटप करण्यात आहे

 SBI-RSETI च्या वतीने गरीब गरजू घटकांना  कापड वाटप करण्यात आहे


वाशिम : (युगनायक न्युज नेटवर्क) स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था वाशिम च्या वतीने गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत कापड वाटप करण्यात आले भारतीय स्टेट बँक RSETI 2वाशिम येथील शिवणकाम प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिकणार्थ्यांनी शिवलेल्या कापड्याचे वाटप नुकतेच ग्राम भरजहाँगीर व सोनुना येथील गरीब कुटुंबातील लाभार्थींना करण्यात आले एस. बी. आय.आरसेटी. वाशिम च्या वतीने  विविध स्वयंरोजगाराचे मोफत प्रशिक्षण दिल्या जाते त्यामध्ये महिलांसाठी ब्युटी पार्लर शिवणकाम तसेच पुरुषासाठी टु-व्हिलर दुरुस्ती, मोबाईल रिपेरिंग, बकरी पालन, दुग्ध व्यवसाय, इत्यादी अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जातात प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रशिकणार्थीची राहण्याची व जेवणाची व्यवस्था RSETI च्या वतीने मोफत केली जाते.अश्या प्रकारचेआयोजित  महिलां शिवणकाम प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण कालावधीमध्ये शिवलेल्या कपड्याचे वाटप संस्थेचे संचालक  चंदन गवई सर यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण भागातील गरीब लाभार्थ्यांना करण्यात आले अश्या प्रकारचे सामाजिक कार्य SBI-RSETI च्या वतीने केले जाते

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू