जिल्ह्यात ‘रोहयो’ची जास्तीत जास्त कामे सुरु करा - अपर मुख्य सचिव नंद कुमार

 जिल्ह्यात ‘रोहयो’ची जास्तीत जास्त कामे सुरु करा

-         अपर मुख्य सचिव नंद कुमार
वाशिमदि. १० (युगनायक न्यूज नेटवर्क) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात जास्तीत जास्त कामे सुरु करण्याच्या सूचना रोजगार हमी योजना विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी दिल्या. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज, १० मार्च रोजी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्त शांतून गोयल, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शैलेश हिंगे यांच्यासह सामाजिक वनीकरण आणि वन विभागाचे अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या सभेत सहभागी झाले होते.
अपर मुख्य सचिव नंद कुमार म्हणाले, सर्व ग्रामपंचायतींना व संबंधित यंत्रणांना यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरु करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. रोहयोची अपूर्ण कामे असतील, तेथे सदर कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी तातडीने करावी. तसेच मोठ्या प्रमाणात नवीन कामे हाती घेवून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यात रोहयोची जास्तीत जास्त कामे सुरु होतील, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मजुरांनी कामाची मागणी नोंदविण्याचे आवाहन
ग्रामीण भागातील जॉबकार्डधारक अकुशल मजुरांनी काम मागणीसाठी नमुना क्र. ४ मध्ये लेखी अर्ज ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवकग्राम रोजगार सेवकपंचायत समिती अथवा तहसील कार्यालय यापैकी कोणत्याही एका ठिकाणी भरून द्यावा. या अर्जासोबत बँक पासबुकची व आधारकार्डची छायांकित प्रत जोडावी. ज्या अकुशल मजूर कुटुंबाकडे जॉबकार्ड नाहीअशा मजुरांनी ग्रामपंचायतपंचायत समिती अथवा तहसील कार्यालयाकडे तात्काळ जॉबकार्डची मागणी नोंदवावी, असे आवाहन षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू