'होम क्वारंटाईन' करण्याचे अधिकार तहसीलदारांना प्रदान

'होम क्वारंटाईन' करण्याचे अधिकार तहसीलदारांना प्रदान
वाशिम, दि. १५ (युगनायक न्युज नेटवर्क) : कोरोना बाधित रुग्णांच्या आरोग्य स्थिती व घरात स्वतंत्र राहण्याची सुविधा असल्याची खात्री करून गृह अलगीकरण (होम क्वारंटाईन) करण्यात येत. याबाबतचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे होते. मात्र, आता सदर अधिकारी संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, १५ मार्च रोजी जारी केले आहेत.




Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू