Posts

Image
  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’   या मोहिमेमध्ये आपण सहभागी होऊन आपल्या कुटुंबियांची कोरोनापासून काळजी घेऊ आणि आपल्या समाजातील इतरांनाही तो होणार नाही, यासाठी दक्ष राहू!   या मोहिमेचे बोधचिन्ह डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.   तुमचे व्हॉटस ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइनचे डीपी (Display Picture) म्हणून हे बोधचिन्ह ठेवा आणि तुमच्या मित्रमंडळींना संदेश द्या- “मी माझ्या कुटुंबाची काळजी घेतो, कारण मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे!” माझे कुटुंब, माझी जबाबदारी-  बोधचिन्ह-  (मराठी)

नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सनदी लेखापाल निश्चित · प्रत्येक सोमवारी ‘आत्मा’ कार्यालयात उपस्थित राहणार

Image
  नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सनदी लेखापाल निश्चित ·          प्रत्येक सोमवारी ‘आत्मा’ कार्यालयात उपस्थित राहणार वाशिम ,   दि. २५ (जिमाका) :   कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात ‘आत्मा’ कार्यालय अंतर्गत नोंदणीकृत इच्छुक शेतकरी गटाचे, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सनदी लेखापाल (सीए) पी. सी. भंडारी अँड सीओ, रामदास पेठ, अकोला यांची ११ महिन्यांसाठी तात्पुरती निवड करण्यात आली आहे.  ‘आत्मा’ कार्यालय अंतर्गत नोंदणीकृत इच्छुक शेतकरी गटाचे, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पात्रताधारक सनदी लेखापाल (सीए) यांची निवड करण्यासाठी ‘आत्मा’ कार्यालयामार्फत दरपत्रक मागविण्यात आली होती. सदर दरपत्रकानुसार सनदी लेखापाल पी. सी. भंडारी अँड सीओ, रामदास पेठ, अकोला यांचे दर सर्वात कमी असल्याने त्यांची ११ महिन्यांसाठी तात्पुरती निवड करण्यात आली आहे. सदर सनदी लेखापाल हे शासकीय सुट्टीचे दिवस वगळता दर सोमवारी ‘आत्मा’ कार्यालयात उपस्थित राहून ‘आत्मा’ अंतर्गत ...

कोरोना_अलर्ट

Image
  कोरोना_अलर्ट (दि. २५ सप्टेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)   जिल्ह्यात आणखी ४९ कोरोना बाधित; १२४ जणांना डिस्चार्ज काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १, शृंगऋषी कॉलनी परिसरातील १, नवीन आययुडीपी येथील १, चामुंडादेवी परिसरातील ३, साईलीला नगर येथील १, नवीन पोलीस वसाहत परिसरातील ३, विनायक नगर परिसरातील ४, पाटणी चौक परिसरातील १, शुक्रवार पेठ परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, पोस्ट ऑफिस जवळील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ४, तामसी येथील १, केकतउमरा येथील २, शेलगाव येथील १, काटा येथील १, रिसोड शहरातील पॉवर हाऊस परिसरातील १, अनंत कॉलनी परिसरातील ४, सिव्हील लाईन्स येथील १, सोनाटी येथील ३, आसेगाव पेन येथील १, गणेशपूर येथील १, व्याड येथील १, बेलखेडा येथील २, मालेगाव तालुक्यातील इराळा येथील १, कारंजा लाड शहरातील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.   दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १२४ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे....

राजधानीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी

Image
  राजधानीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी नवी दिल्ली दि. २५ :   पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त तथा सचिव निधी पांडे, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

  विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध वाशिम ,  दि. २५ (जिमाका) :  राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानुसार ३३-रिसोड, ३४-वाशिम व ३५ कारंजा या विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी आज, २५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतिम मतदार यादीनुसार ३३-रिसोड विधानसभा मतदार संघात १ लक्ष ६२ हजार ६२४ पुरुष, १ लक्ष ४६ हजार ९१६ महिला, ३ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष ९ हजार ५४३ मतदार आहेत. तसेच ३४- वाशिम विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ८१ हजार ९७७ पुरुष, १ लक्ष ६७ हजार १७३ महिला आणि १ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष ४९ हजार १५१ मतदार, तर ३५- कारंजा विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ५७ हजार ६५ पुरुष, १ लक्ष ४५ हजार ११५ महिला आणि ६ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष २ हजार १८६ मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण ५ लक्ष १ हजार ६६६ पुरुष, ४ लक्ष ५९ हजार २०४ महिला आणि १० तृतीयपंथी अशा एकूण ९ लक्ष ६० हजार ८८० मतदारांचा अंतिम मतदार यादीमध्ये समावेश आहे. जि...

माध्यम प्रतिनिधींची अँटीजेन चाचणी

Image
  माध्यम प्रतिनिधींची अँटीजेन चाचणी भंडारा दि. २५ :  मार्च २०२० पासून आपल्या देशात कोविड-१९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव असून कोरोना आजाराची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविणारे माध्यम प्रतिनिधी या दरम्यान हायरिस्क क्षेत्रात वावरत आले आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या पुढाकाराने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पत्रकारांची अँटीजेन तपासणी आज करण्यात आली. सामान्य रूग्णालय भंडारा, जिल्हा चिकीत्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधूरी माथूरकर, डॉ. प्रशांत उईके यांच्या सहकार्याने विश्रामगृह भंडारा येथे माध्यम प्रतिनिधींसाठी अँटीजेन तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरात 43 पत्रकारांनी सहभाग घेतला असून सर्वांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. ही चाचणी डॉ. राहूल गजभिये व डॉ. दिनेश मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आली. मंत्र्यांचे दौरे, बैठका, पत्रकारा परिषदा तसेच कोरोनाचे वृत्तसंकलन करून सर्व सामान्य वाचकांपर्यंत पोचविण्याचे महत्वाचे काम माध्यम प्रतिनिधी करत असतात. कोरोना काळात शासनाने केलेल्या उपायोजना, वेळोवेळी दिलेले...

ऑक्सिजन, बेडस् आणि औषधांची कमतरता निर्माण होणार नाही याची काळजी घ्या – पालकमंत्री छगन भुजबळ

Image
  ऑक्सिजन, बेडस् आणि औषधांची कमतरता निर्माण होणार नाही याची काळजी घ्या – पालकमंत्री छगन भुजबळ नाशिक , दि.  २५ सप्टेंबर (जिमाका वृत्त)  :  जिल्ह्यात उपलब्ध असलेली रेमडिसिव्हरची इंजेक्शन रूग्णांना वेळेत व वाजवी दराने मिळतील याची दक्षता घ्यावी. रेमडिसिव्हरचा पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच त्याचा किती साठा उपलब्ध आहे याबाबत प्रत्येक रुग्णालयाबाहेर बोर्ड लावण्यात यावा. जास्तीत जास्त रेमडिसिव्हरचासाठा शासकीय रुग्णालयाच्या औषध विक्री केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्याच्या सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.   कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्याची आढावा बैठक राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.  जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीत पालकमंत्री श्री.भुजबळ बोलत होते.   यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज आहिरे, जिल्हाधिकारी सुर...

३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळावा; इच्छुक उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन

Image
  ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळावा; इच्छुक उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन ·          १५० पेक्षा अधिक पदांसाठी होणार ऑनलाईन मुलाखती वाशिम ,  दि. २५ (जिमाका) :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने  www.rojgar.mahaswayam.gov.in   या वेबपोर्टलवर  ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये उमेदवारांनी सहभाग नोंदविणे व तदनंतर कंपनी किंवा संबंधित आस्थापनांच्या उद्योजक, प्रतिनिधींकडून मुलाखत प्रक्रिया, पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड इत्यादी अनुषंगिक प्रक्रिया वेबपोर्टलवरूनच करण्यात येणार आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये आय.सी.आय.सी. बँक सेल्स अॅकॅडमी, अकोला येथील इनोट्रो मल्टीसर्व्हिसेस प्रा. लि., अमरावती येथील टेक्नोक्रॉफ्ट इंडस्ट्रीज, एस. आय.इंडिया प्रा. लि., पुणे, औरंगाबाद येथील परम स्किल्स ट्रेनिंग प्रा. लि. आदी नामांकित उद्योग, कंपनीमध्ये ऑनलाईन मुलाखतीद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांना रोजगार देणार आहेत. या मेळाव्यात १५० प...

एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी संगीत भाषा- प्रांतापलीकडे पोहोचविले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

Image
  एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी संगीत भाषा- प्रांतापलीकडे पोहोचविले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली मुंबई, दि.२५ :-  आपल्या नाद-मधुर सुरांनी संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलीकडे असते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम सुरांच्या दुनियेतील मनस्वी अवलिया होते. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.   मुख्यमंत्री श्री.ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, भारतीय चित्रपटसृष्टीला  मिळालेले संगीताचे वरदान ‘एसपीं’नी आपल्या सुरांनी आणखी झळाळून टाकले. त्यांनी सोळा भाषांतून हजारो गाणी गायली, तीही विविध प्रकारची. यातून सुरांवर हुकुमत गाजविणाऱ्या ‘एसपीं’नी आपला एक रसिक वर्ग निर्माण केला. संगीत हे भाषा आणि प्रांत या पलीकडे असते हे सिद्ध करत ‘एसपीं’नी आपल्या नाद-मधुर सुरांनी भारतासह जगातील रसिकांना मोहवून टाकले. त्यांचा आवाज हीच त्यांची ओळख होती. अगदी अलीकडे त्यांनी मराठीतही एक गाणे आपल्या मनस्वी शैलीत गायले होते. कोरोनाशी झुंज देत असणाऱ्या या सुरांच्या दुनियेतील अवलियाला काळाने आपल्यातून ओढून नेले आहे. त...

एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे प्रतिभावंत गायक हरपला – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Image
  एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे प्रतिभावंत गायक हरपला – महसूलमंत्री बाळासाहेब थोरातमुंबई,   दि. २५: सुरांवरची पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे ज्येष्ठ गायक श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रमण्यम अर्थात एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा आवाज अनेकांच्या ह्रदयात कोरला गेला आहे. त्यांच्या निधनामुळे प्रतिभावंत गायक हरपला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रध्दांजली अर्पण केली. श्री.थोरात शोकसंदेशात म्हणतात, एस.पी. बालसुब्रमण्यम हे नाव माहीत नाही असा संगीतप्रेमी भारतात सापडणार नाही. पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलेल्या एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशा बहुभाषांमध्ये पार्श्वगायन केले. एका दिवसात सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला. ९० च्या दशकात त्यांना अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणूनही ओळखले जायचे. गायनाबरोबरच अभिनयाची आवड असणाऱ्या एस.पी.बालसुब्रमण्यम यांनी ‘हम से है मुकाबला’ सिनेमात कामही केले होते. एस.पी.बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून आपण त्यांच्या...

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत कोकण विभागाचे काम अव्वल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Image
  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत कोकण विभागाचे काम अव्वल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवी मुंबई, दि.25 :- कोकण विभागात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण असल्यास टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी.ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील याकडे लक्ष द्यावे. प्रचार प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत. कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ आणि कोकण विभागातील जिल्हाधिकारी यांच्याशी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. कोकण भवन येथे नवी मुंबई पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंग, कोकण पोलीस महानिरीक्षक  निकीत कौशिक उपस्थित होते. राज्यमंत्री,  कु. आदिती तटकरे  म्हणाल्या, बरे झालेले रुग्ण आणि त्यांची  माहिती  प्रसारमाध्यमांद्वारे सर्वत्र प्रसिद्ध करावी. जनजागृती...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले.

Image
  मुंबई दि. २५:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात,पंडित दीनदयाळ उपाध्याय सेवाव्रती आणि कुशल संघटक होते. त्यांनी मानव आणि राष्ट्र कल्याण यांना सर्वोच्च मानले. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

Image
  पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन वाशिम, दि. २५ :  पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसीलदार तथा अधीक्षक प्रशांत जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

केंद्राने असंविधानिक पद्धतीने शेतकरी विरोधी बिल पास केले- सुरेश सातरोटे

Image
आम आदमी पार्टी, महाराष्ट् *केंद्राने असंविधानिक पद्धतीने शेतकरी विरोधी बिल पास केले- सुरेश सातरोटे* वाशिम :  देशभरातील शेतकरी व संसदेतले विरोधी पक्षांचा आवाज दाबत काही मोजक्या उद्योगपतींच्या दबावाखाली येऊन केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभेमध्ये तीन शेती विरोधी बिले पारित केली. विशेषतः राज्यसभेत त्यांचे बहुमत नसताना देखील आवाजी मतदानाच्या जोरावर असंविधानिकरित्या ही बिले पारित करण्यात आली. या कायद्यांमुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या मनात रोष आहे. केंद्र सरकारने आणलेल्या या कायद्यांविरोधात आम आदमी पार्टीने देशभरात निदर्शने केली. आम आदमी पार्टी जिल्हा वाशिमचे वतीने आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक , वाशिम येथे जमून केंद्र सरकारच्या या काळ्या कायद्यांविरोधात निदर्शने केली. यावेळी 'केंद्र सरकार हाय हाय', 'शेती विरोधी कायदे करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो', 'शेतीमालाला हमीभाव नाकारणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो' घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.   केंद्र सरकारने एकूण तीन बिले पारित केली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार समितीच्या बाहेर विकण्याची मुभा दिली परंत...

वाशिम जिल्ह्यातील आजचा कोरोना अलर्ट

Image
कोरोना_अलर्ट (दि. २४ सप्टेंबर २०२०, सायं. ६.०० वा.)   जिल्ह्यात आणखी ९९ कोरोना बाधित; ९५ जणांना डिस्चार्ज   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिंधी कॉलनी येथील १, सुभाष चौक येथील १, पाटणी चौक येथील १, रावले नगर येथील १, लाखाळा परिसरातील ४, काळे फाईल येथील २, योजना पार्क परिसरातील २, सुदर्शन नगर येथील १, आययुडीपी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, शेलू खुर्द येथील १, शिरपुटी येथील १, गोंडेगाव येथील १, टो येथील ६, शेलगाव येथील २, मानोरा शहरातील १, हातोली येथील ३, रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, अनंत कॉलनी परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, लोणी फाटा येथील २, बेलखेडा येथील २, पिंप्री सरहद येथील १०, देगाव येथील २, नेतान्सा येथील २, लोणी येथील १, हराळ येथील १, येवती येथील १, मंगरूळपीर शहरातील १, शेलूबाजार येथील २, माळशेलू येथील ६, धोत्रा येथील २, कासोळा येथील १, मालेगाव शहरातील ६, शिरपूर जैन येथील १, डव्हा येथील २, इराळा येथील १, कारंजा लाड शहरातील आशाताई गावंडे कॉलनी परिसरातील १, सिंधी कॅम्प येथील ३, टिळक चौक येथील ४, आनंद नगर येथील १, शह...

कोरोना_अलर्ट

  कोरोना_अलर्ट (दि. २३ सप्टेंबर २०२०, सायं. ६.०० वा.) जिल्ह्यात आणखी ५६ कोरोना बाधित; ६७ जणांना डिस्चार्ज काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील पुसद नाका परिसरातील १, सुंदरवाटिका येथील २, तिरुपती सिटी येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील २, महात्मा फुले चौक येथील १, आययुडीपी येथील १, शुक्रवार पेठ येथील १, चतुर्थ कॉलनी येथील ३, गणेश पेठ येथील ३, अकोला नाका परिसरातील २, नालंदा नगर येथील १, पाटणी चौक परिसरातील १, लाखाळा परिसरातील १, लक्झरी बसस्थानक परिसरातील १, अनसिंग येथील २, तोंडगाव येथील १, पार्डी आसरा येथील १, कोंडाळा महाली येथील २, ब्रह्मा येथील २, सावंगा येथील १, करंजी येथील १, तामसी येथील १, हिवरा रोहिला येथील २, रिसोड शहरातील शिवाजी रोड परिसरातील १, वाकद येथील १, मोरगव्हाण येथील १, रिठद येथील १, येवती येथील १, मंगरूळपीर शहरातील ४, पारवा येथील २, शेलूबाजार येथील १, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, शिक्षक कॉलनी येथील १ व इतर ठिकाणचा १, लोहारा येथील १, मालेगाव शहरातील २, शिरपूर जैन येथील १, घाटा येथील १ व्य...

लोकसेनेच्या मुंबई शहराध्यक्षपदी खालिद उस्मान तर महाराष्ट्र प्रभारीपदी इब्राहिम पटेल

Image
  लोकसेनेच्या मुंबई शहराध्यक्षपदी खालिद उस्मान तर महाराष्ट्र प्रभारीपदी इब्राहिम पटेल  प्रतिनिधि: लोकसेना संघटना महाराष्ट्रामध्ये प्रा. इलियास इनामदार यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करत असून याच आधारावर खुप कमी कालावधीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये  लोकसेना संघटनाची पालेमुळे पोहोचन्यास सुरुवात झालेली आहे.  लोकसेना संघटन मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी सुरु आहे राज्यात अनेक जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी झालेल्या  आहे. व पुढील निवड मुंबई शहरातील माहिम येथील सामाजिक कार्यकर्ते हाजी खालिद उस्मान यांची मुंबई शहर अध्यक्षपदी निवड,  तर पालघर येथील बहुजन समाज पार्टी मध्ये मागील काळात राज्यस्तरीय पातळीवर काम करणारे नेते म्हणून  ओळख असणारे मोहम्मद इब्राहिम पटेल यांची लोकसेना संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश प्रभारीपदी लोकसेना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी निवड केली आहे. यानिवड़ीमुळे हाजी खालिद उस्मान व मोहम्मद इब्राहिम पटेल यांचे सर्व स्तरातुन अभिनन्दन होत आहे व त्यांना पुढील कार्यास सुभेच्छा देवून त्यांना...

उद्या आम आदमी पार्टी कडून किसान विरोधी बिलाचा निषेध

Image
उद्या आम आदमी पार्टी कडून किसान विरोधी बिलाचा निषेध आपण सर्वांना माहित आहेकि केंद्र सरकार कडून राज्यसभेत लोकशाहीची हत्या करुण शेतकऱ्यांच्या विरोधात व कारपोरेट च्या हिताचे तीन विधेयक मंजूर केले. या विधेयकावर राज्यसभेत आम आदमी पार्टीचे खासदार श्री संजय सिंग यांच्या सह ज्या खसदारांनी बोलन्याचा प्रयत्न केला त्यानां निलंबित करण्यात आले, एकूणच केंद्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने जात असल्यामुळे किसान विरोधी विधेयकाचा उद्या देश भर निषेध करण्यात येत आहे. आम्ही सुद्धा आपल्या शहरात उद्या दी 24/9/2020 ला सकाळी ठीक 11.30 वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शेतकरी विरोधी विधेयकाचा काली पट्टी बांधून निषेध व्यक्त करणार आहोत. यावेळी महामारीच्या नियमाचे पालन करीत हे आन्दोलन होईल, या मध्ये ज्यास्तित जास्त संख्येनी शेतकरी बांधव व लोकशाही मजूबत करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे , असे आवाहन आम आदमी पार्टी चे जिल्हा सघटनमंत्री यांनी केले आहे.

३० सप्टेंबर पर्यंत ‘महास्वयंम’ पोर्टलवर आधार लिंक करण्याचे आवाहन

३० सप्टेंबर पर्यंत ‘महास्वयंम’ पोर्टलवर आधार लिंक करण्याचे आवाहन वाशिम, दि. २३ : जिल्ह्यातील सर्व युवक, युवतींना रोजगार तथा स्वयंरोजगाराच्या तसेच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून www.rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील युवक, युवतींनी या पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे. ज्या उमेदवारांनी या आधी नोंदणी केली असेल त्यांनी नोकरी विषयक संधीचा लाभ घेण्यासाठी आपल्या प्रोफाईलला ३० सप्टेंबर २०२० पर्यंत आधार क्रमांक लिंक करावा. तसेच आपल्या शैक्षणिक, कौशल्य व अनुभवाची अद्ययावत नोंदणी करावी. अन्यथा आपले प्रोफाईल नूतनीकरण स्थगित करण्यात येईल, आपणास नोकरीविषयक माहिती उपलब्ध होणार नाही, असे श्रीमती बजाज यांनी कळविले आहे.

‘फ्रेश वॉटर फिश फार्मिंग’ विषयावर आज मोफत वेबीनारचे आयोजन

  ‘फ्रेश वॉटर फिश फार्मिंग’ विषयावर आज मोफत वेबीनारचे आयोजन वाशिम ,  दि. २२ :  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने बुधवार, २३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ४ वा. दरम्यान   ‘ फ्रेश वॉटर फिश फार्मिंग ’  विषयावर मोफत वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ संशोधक डॉ. रवींद्र काळे हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी मत्स्य व्यवसाय क्षेत्रात स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवक, युवतींनी या वेबीनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे. वेबीनारमध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या युवक, युवतींनी  https://meet.google.com/key- paau-hkt   या लिंकवर क्लिक करून या सत्रात सहभागी व्हावे. वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी  ‘ गुगल मीट ’ (google meet)  अॅप डाऊनलोड करावे. या अॅपमधून कनेक्ट झाल्यानंतर  ‘ आस्क टू जॉईन ’ (Ask to Join)  वर क्लिक करावे. सत्रामध्ये सहभागी होण्यापूर्वी १० मिनिट अगोदर जॉईन करावे. कनेक्ट झाल्यानंतर लगेच आपला व्...