उद्या आम आदमी पार्टी कडून किसान विरोधी बिलाचा निषेध

उद्या आम आदमी पार्टी कडून किसान विरोधी बिलाचा निषेध आपण सर्वांना माहित आहेकि केंद्र सरकार कडून राज्यसभेत लोकशाहीची हत्या करुण शेतकऱ्यांच्या विरोधात व कारपोरेट च्या हिताचे तीन विधेयक मंजूर केले. या विधेयकावर राज्यसभेत आम आदमी पार्टीचे खासदार श्री संजय सिंग यांच्या सह ज्या खसदारांनी बोलन्याचा प्रयत्न केला त्यानां निलंबित करण्यात आले, एकूणच केंद्र सरकार दडपशाहीच्या मार्गाने जात असल्यामुळे किसान विरोधी विधेयकाचा उद्या देश भर निषेध करण्यात येत आहे. आम्ही सुद्धा आपल्या शहरात उद्या दी 24/9/2020 ला सकाळी ठीक 11.30 वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शेतकरी विरोधी विधेयकाचा काली पट्टी बांधून निषेध व्यक्त करणार आहोत. यावेळी महामारीच्या नियमाचे पालन करीत हे आन्दोलन होईल, या मध्ये ज्यास्तित जास्त संख्येनी शेतकरी बांधव व लोकशाही मजूबत करण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे , असे आवाहन आम आदमी पार्टी चे जिल्हा सघटनमंत्री यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू