एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे प्रतिभावंत गायक हरपला – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे प्रतिभावंत गायक हरपला – महसूलमंत्री बाळासाहेब थोरातमुंबई,
दि. २५: सुरांवरची पकड आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे ज्येष्ठ गायक श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रमण्यम अर्थात एस. पी. बालसुब्रमण्यम यांचा आवाज अनेकांच्या ह्रदयात कोरला गेला आहे. त्यांच्या निधनामुळे प्रतिभावंत गायक हरपला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एस.पी. बालसुब्रमण्यम यांना श्रध्दांजली अर्पण केली.
श्री.थोरात शोकसंदेशात म्हणतात, एस.पी. बालसुब्रमण्यम हे नाव माहीत नाही असा संगीतप्रेमी भारतात सापडणार नाही. पद्मश्री आणि पद्मभूषण या किताबांनी गौरवण्यात आलेल्या एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी तेलुगु, तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी अशा बहुभाषांमध्ये पार्श्वगायन केले. एका दिवसात सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रमही त्यांनी केला. ९० च्या दशकात त्यांना अभिनेता सलमान खानचा आवाज म्हणूनही ओळखले जायचे. गायनाबरोबरच अभिनयाची आवड असणाऱ्या एस.पी.बालसुब्रमण्यम यांनी ‘हम से है मुकाबला’ सिनेमात कामही केले होते. एस.पी.बालसुब्रमण्यम यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली असून आपण त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे श्री.थोरात यांनी सांगितले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME