नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सनदी लेखापाल निश्चित · प्रत्येक सोमवारी ‘आत्मा’ कार्यालयात उपस्थित राहणार

 


नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीचे

प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सनदी लेखापाल निश्चित

·        प्रत्येक सोमवारी ‘आत्मा’ कार्यालयात उपस्थित राहणार

वाशिम, दि. २५ (जिमाका) :  कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात ‘आत्मा’ कार्यालय अंतर्गत नोंदणीकृत इच्छुक शेतकरी गटाचे, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सनदी लेखापाल (सीए) पी. सी. भंडारी अँड सीओ, रामदास पेठ, अकोला यांची ११ महिन्यांसाठी तात्पुरती निवड करण्यात आली आहे.

 ‘आत्मा’ कार्यालय अंतर्गत नोंदणीकृत इच्छुक शेतकरी गटाचे, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पात्रताधारक सनदी लेखापाल (सीए) यांची निवड करण्यासाठी ‘आत्मा’ कार्यालयामार्फत दरपत्रक मागविण्यात आली होती. सदर दरपत्रकानुसार सनदी लेखापाल पी. सी. भंडारी अँड सीओ, रामदास पेठ, अकोला यांचे दर सर्वात कमी असल्याने त्यांची ११ महिन्यांसाठी तात्पुरती निवड करण्यात आली आहे.

सदर सनदी लेखापाल हे शासकीय सुट्टीचे दिवस वगळता दर सोमवारी ‘आत्मा’ कार्यालयात उपस्थित राहून ‘आत्मा’ अंतर्गत नोंदणीकृत इच्छुक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी मोफत मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, प्रकल्प अहवालाचा होणारा खर्च संबंधित शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीलाच करावा लागणार आहे. तरी इच्छुक शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी ९४२२१६११३८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू